Tokyo Olympics 2021: जिच्याविरुद्ध 4 वेळा पराभूत झाली, तिलाच नमवत पदक केलं निश्चित, असा मिळवला लवलीनाने विजय

लवलीनाने उपांत्य पूर्व फेरीत चीनी ताइपेची बॉक्सर एन.सी. चेनला नमवत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. याचसोबत तिने किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे.

Tokyo Olympics 2021: जिच्याविरुद्ध 4 वेळा पराभूत झाली, तिलाच नमवत पदक केलं निश्चित, असा मिळवला लवलीनाने विजय
लवलीना बोरगोहेन
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 30, 2021 | 8:11 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिंपिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताचं दुसरं पदक निश्चित झालं आहे. महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain) हिने 69 किलोग्राम वर्गात सेमीफायनलमध्ये जागा मिळवत हे पदक पक्कं केलं आहे. विशेष म्हणजे लवलीनाने विजय मिळवलेल्या बॉक्सर विरोधात लवलीना याआधी चार वेळा पराभूत झाली होती. अखेर आज लवलीनाने विजय मिळवत पराभवाची मालिका खंडीत करत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे.

लवलीनाला सामन्यापूर्वीच माहित होतं की, ती समोर खेळत असलेल्या बॉक्सरने तिला चार वेळा पराभूत केलं होतं. त्यामुळे या सामन्यापूर्वी ती खास रणनीती घेऊनच सामन्यात उतरली होती. तिने सामन्यानंतर बोलताना याबाबत बोलताना सांगितले की,‘‘मी चेन विरोधात चार वेळा पराभूत झाले होते. त्यामुळे मला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी माझ्यासाठी हीच मोठी संधी होती. चार पराभवांचा बदला घेण्याची मला आज संधी होती. मी या संधीचं सोनं करत आज पूर्ण मन लावून खेळले आणि जिंकले. ’’

कांस्य पदक मिळवून नाही थांबायचं

लवलीनाने आता मिळवलेल्या यशाने स्पर्धेत किमान कांस्य पदक पक्के केले आहे. पण तिला सुवर्णपदकापर्यंत मजल मारायची आहे. लवलीना अनेक अडचणींवर मात करत या ठिकाणापर्यंत पोहोचली आहे. त्याबाबत बोलाताना ती म्हणाली,‘‘सध्यातर मी जास्त विचार करत नाहीये. मला कांस्य पदकावर थांबायचं नाही. स्वत:ला सिद्ध कर आठ वर्षे मेहनत करुन मी इथवर आली आहे. त्यामुळे माझं लक्ष सुवर्णपदकचं आहे. ’’

किक बॉक्सिंग सोडून बनली बॉक्सर

भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारी लवलीना आधापासून बॉक्सर नव्हती. ती आधी किक बॉक्सिंग करायची. तिच्या दोन मोठ्या बहिनी लीमा आणि लीचा या देखील किक बॉक्सर आहेत. त्यामुळे तिनेही किक बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली होती. पण नंतर तिला खास कामगिरी करता न आल्याने तिने SAI ने ठेवलेल्या बॉक्सिंग ट्रायलमध्ये भाग घेतला. लवलीनाने 2012 पासून बॉक्सिंगची ट्रेनिंग सुरु केली. त्यानंतर मागील 9 वर्षांच्या मेहनतीची फळ तिला आज मिळाले आहे.

मोहम्मद अलीचं पोस्टर पाहून भारावली लवलीना

प्रत्येक महान खेळाडू हा एका महान खेळाडूची प्रेरणा घेऊनच पुढे जात असतो. लवलीनाच्या बाबतीत हा महान खेळाडू होत जगातील महान बॉक्सर मोहम्मद अली. ‘बीबीसी हिंदी’ च्या वृत्तानुसार लवलीनाचे वडिल एकदा पेपरमध्ये गुंडाळून खाऊ घेऊन आले होते. त्यापेपरमध्ये मोहम्मद अलीचा फोटो होता. तो फोटो पाहताच लवलीनाने वडिलांना त्याच्याबद्दल विचारलं. त्यानंतर मोहम्मद अलीच्या कहानीतून प्रेरणा घेत लवलीनानं बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

(Indias boxer lovlina borgohain secure medal at Tokyo Olympics after defeating N. C. Chen)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें