Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीना पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

भारताच्या महिला बॉक्सर्सनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम पहिल्या सामन्यात विजयानंतर दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली असून बॉक्सर लवलीना उपांत्य पूर्व फेरीत पोहचली आहे.

Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीना पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्यपूर्व फेरीत दाखल
बॉक्सर लवलीना
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 27, 2021 | 12:30 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताचे पुरुष बॉक्सर काही खास कामगिरी करु शकले नसताना महिला बॉक्सर मात्र उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. दिग्गज बॉक्सर मेरी कोमने पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली. तर दुसरीकडे बॉक्सर लवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain) जर्मनीविरुद्ध विजयासह उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. राउंड ऑफ 32 मध्ये बाय मिळाल्यानंतर राउंंड ऑफ 16 च्या सामन्यात लवलीनाने जर्मनीच्या एपेट्ज नेदिनला 3-2 च्या फरकाने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यामुळे आणखी एक सामना जिंकताच लवलीना उपांत्य फेरीत पोहचेल. ज्यामुळे तिचे किमान कांस्यपदक निश्चित होईल.

जर्मनीची बॉक्सर एपेट्ज नेदिनच्या विरोधातील लवलीनाचा सामना सुरुवातीपासूनच दमदार होताना दिसत होता. दोघींनी आक्रमक खेळ दाखवला. पहिल्या राउंडमध्येच लवलीनाने विजय मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये एपेट्जने सर्व अनुभवाचा वापर केला पण लवलीनाच्या पंचेससमोर तिचा निभाव लागला नाही आणि दुसरा राउंडही जिंकला.

तिसरा राउंड ठरला निर्णायक

पहिल्या दोन राउंडमध्ये लवलीनाने विजय मिळवल्यानंतर जर्मनीच्या बॉक्सरने तिसऱ्या राउंडमध्ये विजय मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण जजेसना लवलिनाचाच खेळ अधिक आवडल्याने अखेर सामन्याचा विजय भारताच्या परड्यात पडला. त्यामुळे भारताच्या लवलिनाने हा राउंड ऑफ 16 चा सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीचं तिकिट मिळवलं. उपांत्यपूर्व फेरीत लवलीनाचा सामना चीनी ताइपेच्या बॉक्सरसोबत होणार आहे. पदक निश्चित करण्यासाठी लवलीनाला हा सामना जिंकण अनिवार्य आहे.

कोण आहे लवलीना

लवलीना बोरगोहेन ही एक 24 वर्षीय महिला बॉक्सर असून आसामच्या एका छोटे गावातून ती ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली आहे. लवलीना बोरगोहेन मूळची आसमच्या गोलाघाट जिल्ह्यातील सरुपथर विधानसभेच्या बरोमुखिया या गावातील आहे. केवळ 2 हजार लोकसंख्या असणाऱ्या लवलीनाच्या गावातूनच नाही तर संपूर्ण आसाम राज्यातून ऑलिम्पिकसाठी पात्र होणारी लवलीना पहिली बॉक्सर आहे. ती याआधी दोनदा विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकली असून असून 1.77 मीटर उंच लवलीना सध्या टोक्यो ओलिम्पिकच्या 69 किलोग्राम वर्गात खेळत आहे.

हे ही वाचा

Tokyo Olympics: भारताचा स्पेनवर 3-0 ने विजय, रुपिंदरपालसिंह सामन्याचा हिरो, हॉकीत भारताचा दुसरा विजय

Tokyo Olympics 2021: मनिका बत्राला पराभवानंतर अश्रू अनावर, राष्ट्रीय प्रशिक्षकासोबतही वाद, ‘हे’ आहे नेमकं कारण

Tokyo Olympics 2021: बॅडमिंटन पुरुष दुहेरीत भारताचं दुर्देवं, सामना जिंकूनही सात्विक-चिराग जोडी पराभूतच

(Indias boxer lovlina defeated Germany Boxer and enterd in Quarterfinal at Tokyo Olympics)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें