Tokyo Paralympics 2020 : भारताच्या खिशात आणखी एक पदक, निषाद कुमारने उंच उडीत जिंकलं रौप्य पदक

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 29, 2021 | 6:12 PM

भारताने दिवसभरात टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये दुसरं रौप्य पदकं पटकावलं आहे. भारताचा लांब उडीपटू निशाद कुमारने लांब उडी स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदक मिळवलं आहे.

Tokyo Paralympics 2020 : भारताच्या खिशात आणखी एक पदक, निषाद कुमारने उंच उडीत जिंकलं रौप्य पदक
निशाद कुमारनं जिंकल रौप्य पदक

Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) भारतासाठी आजचा दिवस फारच उत्तम ठरला आहे. सकाळच्या सुमारास टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने (Bhavina patel) रौप्य पदक जिंकल आहे. तर दिवसखेरीस उंच उडी स्पर्धेत निशाद कुमारने भारतासाठी आणखी एक रौप्य पदक पटकावलं आहे.  निशाद कुमारने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत 2.06 मीटर उडी घेत पदक पटकावलं. यासोबतच त्याने आशिया खंडातील उंच उडी रेकॉर्डशी देखील बरोबरी केली आहे.

या स्पर्धेत अमेरिकेचा टाउनसेंड रोडेरिक याने 2.15 मीटरची उडी टाकत सुवर्ण पदक जिंकलं. विशेष म्हणजे त्याने एक नवं जागतिक रेकॉर्डही सेट केले. तर तिसऱ्या स्थानावर अमेरिकेचाच विसे डलास राहिला. त्याने कांस्य पदक पटकावलं.

रामपाल पाचव्या स्थानावर

निशादसह भारताचा आणखी एक खेळाडू जो या स्पर्धेत सहभागी होता त्या रामपालने पाचवं स्थान पटकावलं. त्याने 1.94 मीटरची उंच उडी घेत पाचवं स्थान मिळवलं. तो पदक जिंकू शकला नसला तरी त्याने त्याचा स्वत:चाच पूर्वीचा रेकॉर्ड मात्र ब्रेक केला आहे.

पंतप्रधान मोदींनी दिल्या निशादला शुभेच्छा

निशादने केलेल्या या अप्रतिम कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाद कुमारला ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिंल, “टोक्योमधून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. निषादने पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत  T47 प्रकारात रौप्य पदक मिळवलं आहे. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला शुभेच्छा.”

हे ही वाचा :

Tokyo Paralympics 2020: भाविनाने देशासह कुटुंबियांना समर्पित केलं पदक, नातेवाईकांनी गरबा खेळत साजरा केला विजय

Tokyo Paralympics 2020: भाविनाने टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला, सिल्वर मेडल पटकावलं, क्रीडादिनी देशवासियांचा जल्लोष!

Tokyo Paralympics: भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, टेबल टेनिसच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री, भारताचं पदक पक्क

(Indias high jumper nishad kumar won Silver Medal in tokyo paralympics 2020)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI