Tokyo Olympics 2021: नीरज चोप्राचा ऐतिहासिक थ्रो, मिळवलं फायनलचं तिकिट, भारताला पदकाची आशा

भारतासाठी आजच्या (4 ऑगस्ट) दिवसाची सुरुवात टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उत्तम झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच नीरज चोप्राने भाला फेकच्या पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत फायनलमध्ये जागा मिळवली आहे.

Tokyo Olympics 2021: नीरज चोप्राचा ऐतिहासिक थ्रो, मिळवलं फायनलचं तिकिट, भारताला पदकाची आशा
नीरज चोप्रा

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) भारतीय चाहत्यांसाठी बुधवारच्या दिवसाची सुरुवात उत्तम झाली आहे. ऑलिम्पिक पदकाची सर्वाधिक आशा असणाऱ्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भाला फेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सहज जागा मिळवत इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाणारा तो पहिला भारतीय ठरला आहे दुसरीकडे भारताला शिवपाल सिंह मात्र भालाफेकच्या पहिल्याच राउंडमध्ये बाहेर गेला आहे.

कॉमनवेल्थ आणि आशियाई गेम्समध्ये पदक विजेता नीरज याने बुधवारी ऑलिम्पकच्या क्वॉलिफाइंग राउंडमध्येही दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर लांब भाला फेकला. त्याच्या थ्रोनंतर प्रशिक्षकांसह सर्वच भारतीय स्टाफ आनंदी होता. पहिल्याच प्रयत्ना अपेक्षित अंतर पार केल्याने त्याने फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्याच्या या दमदार थ्रोचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नीरजचा एक थ्रो अनेक रेकॉर्ड

नीरडने पात्रता फेरीत फेकलेला अप्रतिम थ्रो भारतासाठी सर्वोत्कृष्ट ठरला. या एका थ्रोने अनेक रेकॉर्ड नीरजच्या नावे केले आहेत. ऑलिम्पकच्या फायनलमध्ये जागा मिळवणारा नीरज भारताचा पहिला खेळाडू बनला आहे. तर  ओलिम्पिकच्या  एथलेटिक्स स्पर्धेच्या फायनलमध्ये जागा मिळवणारा 12 वा भारतीय बनला आहे.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचा सेमीफायनल सामना पाहण्यासाठी सर्वच उत्सुक,आसाम विधानसभेचं कामकाजही 30 मिनिटांपर्यत स्थगित

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

(Indias Neeraj chopra qualifies for final event of javelin throw at Tokyo Olympics)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI