Tokyo Olympics 2021: बॅडमिंटन पुरुष दुहेरीत भारताचं दुर्देवं, सामना जिंकूनही सात्विक-चिराग जोडी पराभूतच

चिराग आणि सात्विकने ग्रेट ब्रिटनच्या बॅडमिंटनपटूंना 21-17 आणि 21-19 च्या फरकाने नमवत सामना आपल्या नावे केला. पण एका कारणामुळे ते पुढील फेरीत जाऊ शकले नाहीत.

Tokyo Olympics 2021: बॅडमिंटन पुरुष दुहेरीत भारताचं दुर्देवं, सामना जिंकूनही सात्विक-चिराग जोडी पराभूतच
चिराग-सात्विक
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jul 27, 2021 | 11:44 AM

Tokyo Olympics 20-2021 : भारतीय खेळाडूंना यंदाच्या  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) हवी तशी कामगिरी करता येत नसून बॅडमिंटन पुरुष दुहेरीत चिराग-सात्विक जोडीतर सामना जिंकूनही पुढच्या फेरीत जाऊ शकली नाही.  ग्रेट ब्रिटनच्या बेन लेन आणि सीन वँडी जोडी विरुद्ध भारताच्या चिराग आणि सात्विक जोडीने सरळ सेट्समध्ये विजय मिळवला. पण या विजयानंतरही ते क्वॉर्टर फायनलमध्ये पोहचू शकले नाहीत. याचे कारण भारत असणाऱ्या ग्रुपमधून दोनच संघ पुढील फेरीत जाणार होते. यावेळी तायवान आणि इंडोनेशिया पहिल्या दोन क्रमांकावर असून भारत तिसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे पुढच्या फेरीत जाऊ शकला नाही.

चिराग आणि सात्विकने ग्रेट ब्रिटेनच्या बेन लेन आणि सीन वँडीला 21-17 आणि 21-19 अशा सरळ सेट्समध्ये नमवत सामन्यात एक अप्रतिम विजय मिळवला. ब्रिटिश जोडीने दुसरा गेम जिंकण्यासाठी बरीच मेहनत घेतली पण पहिल्या दोन सेट्समध्ये भारताने विजय मिळवल्याने सामना भारत विजयी झाला.

चिराग-सात्विक जिंकूनही पराभूत

चिराग आणि सात्विक सामन्यात अप्रतिम विजय मिळवल्यानंतरही बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीतील क्वॉर्टर फायनलमध्ये जागा मिळवता आली नाही. याचे कारण भारत स्वत:च्या ग्रुपमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. तर पहिल्या दोन जागांवर तायवान आणि इंडोनेशियाचा संघ होता. भारताला क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ग्रेट ब्रिटेनला मात देण आवश्यक होतं. ती कामगिरी भारताने केली देखील पण इंडोनेशिया संघाला देखील चीनी ताइपेविरुद्ध सामना जिंकणे आवश्यक होते त्यानेच भारत पुढील फेरीत जाऊ शकला असता. पण इंडोनेशिया पराभूत झाल्याने भारत क्वॉर्टर फायनलचे तिकीट मिळवू शकला नाही.

हे ही वाचा

Tokyo Olympics: भारताचा स्पेनवर 3-0 ने विजय, रुपिंदरपालसिंह सामन्याचा हिरो, हॉकीत भारताचा दुसरा विजय

Tokyo Olympics 2021: मनिका बत्राला पराभवानंतर अश्रू अनावर, राष्ट्रीय प्रशिक्षकासोबतही वाद, ‘हे’ आहे नेमकं कारण

(Indias satwiksairaj rankireddy and chirag shetty fail to qualify for quarter final in Tokyo Olympics)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें