Tokyo Olympic 2021 : भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाचा राजीनामा, ऑलिम्पकमधील पराभव नाही तर दुसरेच आहे कारण

स्वप्नवत कामगिरी करत भारतीय महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनलपर्यंत मजल मारली होती. पण सेमीफायनलमध्ये तगड्या अर्जेंटीना संघाकडू पराभूत झालेल्या महिलांना कांस्य पदकाच्या सामन्यातही ब्रिटनकडून 4-3 ने पराभव पत्करावा लागला.

Tokyo Olympic 2021 : भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाचा राजीनामा, ऑलिम्पकमधील पराभव नाही तर दुसरेच आहे कारण
श्योर्ड मरीन्ये
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 5:29 PM

Tokyo Olympic 2021 : भारतीय महिला हॉकी संघाने (Indians Women Hockey Team) यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ऐतिहासिक कामगिरी करत सेमीफायलनपर्यंत धडक मारली. पण सेमीफायनलमध्ये तगड्या अर्जेंटीना संघाकडून आणि त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत ग्रेट ब्रिटनकडून 4-3 ने पराभव मिळाल्यामुळे भारतीय महिलांचे पदक मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. या पराभवानंतर महिला संघाचा प्रशिक्षक श्योर्ड मरीन्ये याने त्याच्या पदाचा राजीनामा दिला.

त्याने हा राजीनामा संघाचा पराभव झाला म्हणून दिला नसून कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी दिला असल्याचे सांगितले. सामन्यानंतर बोलताना मरीन्ये म्हणाला, “माझा यानंतर कोणताही प्लॅन नसून भारतीय महिला संघासोबत माझा हा शेवटचा सामना होता.”

करार वाढवण्याची संधी

समोर आलेल्या माहितीनुसार मरिन्ये आणि संघ व्यवस्थापन यांच्यात चर्चेनंतर भारतीय खेळ प्रधाकिरणाने (SAI)  करार वाढवण्याचा प्रस्ताव देखील मरिन्ये समोर ठेवला होता. पण खाजगी कारण देत मरिन्येने हा प्रस्ताव अमान्य केला. मूळचा नेदरलँड्चा असणाऱ्या मरीन्येने 2017 मध्ये भारतीय पुरुष संघाचा प्रशिक्षक म्हणून जागा घेतली होती. त्यानंतर 2018 मध्ये महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 : महिला हॉकी संघातील हरयाणाच्या खेळाडूंना बक्षिस, प्रत्येकी 50 लाख रुपये देऊन होणार सन्मान

 गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर

(Indias Women hockey team Coach Sjoerd Marijne left the team)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.