Tokyo Olympics 2021: ‘या’ खेळात 13 वर्षीय मुलींची कमाल, एकीने जिंकल सुवर्णपदक तर दुसरीच्या नावे रौप्यपदक

टोक्यो ओलिम्पिकच्या चौथ्या दिवशीच्या सुरुवातीलाच अवघ्या 13-13 वर्षाच्या दोन खेळाडूंनी देशाला सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवून दिलं. यातील एक खेळाडू जपानची तर दुसरी ब्राझीलची आहे.

Tokyo Olympics 2021: 'या' खेळात 13 वर्षीय मुलींची कमाल, एकीने जिंकल सुवर्णपदक तर दुसरीच्या नावे रौप्यपदक
निशिया मोमजी

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकचा (Tokyo Olympics) आज चौथाच दिवस असून अनेक चुरशीचे सामने आणि खेळाडूंचा उत्कृष्ठ खेळ पाहायला मिळतो. चौथ्या दिवशी स्केटबोर्डिंगमध्ये तर अवघ्या 13 वर्षीय मुलींची कमाल दिसून आली. 13-13 वर्षाच्या दोघींनी एकाच स्केटबोर्डिंगच्या स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदकं पटकावली. यावेळी जपानच्या निशिया मोमजी (nishiya momiji) हिने सुवर्णपदक तर ब्राझीलच्या रायसा लील (Raysa lil) हिने रौप्यपदक खिशात घातलं. विशेष म्हणजे या दोघीही अवघ्या 13 वर्षांच्या आहेत.

महिलांच्या स्केटबोर्डिंग स्पर्धेत कांस्य पदकही जपाननेच पटकावलं. 18 वर्षीय फुना नाकायामा हिने कांस्य पदक पटकावलं. या तिन्ही खेळाडूंच हे पहिलंच ऑलिम्पिक मेडल असून आपल्या आयुष्यातील पहिल्याच ऑलिम्पिक खेळांत या तिघींनी स्वत:ची हवा केली आहे.

अश्रू अनावर

स्केटबोर्डिंगच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर जपानच्या निशिया हिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. आयुष्यात पहिल्यांदाच तेही इतक्या कमी वयात ऑलिम्पिक पदक जिंकल्यामुळे असे होणे साहजिकच होते. निशियासह तिच्या देशासाठी ही एक अत्यंत मोठी आणि मानाची बाब आहे.

हे ही वाचा

Tokyo Olympic 2020 Live : तलवारबाज भवानी देवी दुसऱ्या फेरीत पराभूत, बॅडमिंटनपटू बी साईप्रणीतही स्पर्धेतून बाहेर

भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश

Tokyo Olympics 2021: तिसरा दिवस भारतासाठी निराशाजनक, मेरी कोम, सिंधूची चमकदार कामगिरी, इतर खेळाडू मात्र अयशस्वी

(Japans 13 years old momiji nishiya Won gold Medal in thecwomens street skateboarding)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI