Tokyo Olympics 2021: डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये भारताची कमलप्रीत कौर, वाचा कोण आहे कमलप्रीत?

यंदाच ऑलिम्पिक डेब्यू करणाऱ्या कमलप्रीत कौरने भारतासाठी पहिल्या वहिल्या अॅथेलेटिक्स खेळातील पदकाच्या आशा जागवल्या आहेत. कमलप्रीतने 64 मीटरचा डिस्कस फेकत क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये दुसरे नंबरवर स्थान मिळवलं आहे.

Tokyo Olympics 2021: डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये भारताची कमलप्रीत कौर, वाचा कोण आहे कमलप्रीत?
कमलप्रीत कौर
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 11:27 AM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत भारताने आतापर्यंत वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंग या दोन खेळात पदकं मिळवली असून आता अॅथेलिटक्स खेळातील पहिलं वहिलं पदकही मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. डिस्कस थ्रो (Discus Throw) स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर (Kamalpreet Kaur) हिने फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. ही कमलप्रीत सहभाग घेत असलेली पहिली ओलिम्पिक असून तिने 64 मीटरचे डिस्कस फेकत क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. कमलप्रीत पेक्षा अमेरिकेची डिस्कस थ्रोअर 66.42 मीटर डिस्कस फेकून पुढे होती.

कमलप्रीतने कमाल कामगिरी केली असली तरी दुसरीकडे या स्पर्धेत चौथ्या वेळेस भाग घेणारी भारतीय एथलीट सीमा पुनियामात्र दुसऱ्या प्रयत्नातही 60.57 मीटर डिस्कस फेकून सहाव्या स्थानावर राहिली. सर्व स्पर्धाकांत आणि फेऱ्यांमध्ये मिळून पुनिया 16 व्या स्थानावर राहिली. दरम्यान टॉप 12 डिस्कस थ्रोअरच फायनलमध्ये जात असल्याने पुनिया पुढे जाऊ शकली नाही.

प्रत्येक प्रयत्नात कमलप्रीत यशस्वी

कमलप्रीत कौरने क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये एकही प्रयत्न अयशस्वी होऊ दिला नाही. तिने प्रत्येक प्रयत्नात 60 मीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंतच डिस्कस फेकले. कमलप्रीतने पहिल्या प्रयत्नात 60.29 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात 64 मीटरपर्यंतच अंतर पार केलं.

कोण आहे कमलप्रीत?

कमलप्रीत कौर पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील बादल गावची रहिवाशी आहे. तिने स्वत:च सांगितलं होतं की मी अभ्यासात जास्त हुशार नसल्याने प्रशिक्षकांनी मला एका राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सांगितलं होतं. तिथे मी चांगल प्रदर्शन दाखवलं होतं. अभ्यासात जास्त हुशार नसल्याने कमलप्रीतला खेळांमध्ये जास्त लक्ष द्यावं असं वाटलं. ज्यानंतर तिने या डिस्कस थ्रोमध्ये अधिक सराव करत आज इथवरचा प्रवास पूर्ण केला आहे. 2019 मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ती पाचव्या स्थानावर होती. 2019 संस्करणमध्ये 60.25 मीटर डिस्कस थ्रो करत तिने सुवर्ण पदकही पटकावलं होतं.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

Tokyo Olympics 2021: जिच्याविरुद्ध 4 वेळा पराभूत झाली, तिलाच नमवत पदक केलं निश्चित, असा मिळवला लवलीनाने विजय

(Know about kamalpreet kaur who enters in discus throw final for india in tokyo olympics)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.