Tokyo Olympic 2021: हॉकी संघाच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले…

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 49 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमने 5-2 ने पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

Tokyo Olympic 2021: हॉकी संघाच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...
PM Narendra Modi

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून पराभव झाल्यानंतर सुवर्णपदकाचं स्वप्नही तुटलं. भारत अजूनही कांस्य पदक पटकावू शकतो. मात्र 1980 नंतर पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावण्याची हॉकी संघाला असलेली संधी यंदातरी हातातून निसटली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाची निराशा दूर करत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक ट्विट केलं.

या ट्विटमध्ये मोदी यांनी लिहिलंय,”विजय आणि पराजय जीवनाचा भाग आहेत. टोक्यो ओलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाने त्यांचा सर्वश्रेष्ठ योगदान दिलं आणि तेच जास्त महत्त्वाचं आहे. संघाला पुढील सामन्यासह भविष्यासाठी शुभेच्था. भारताला आपल्या खेळाडूंवर गर्व आहे.

सेमीफायनलच्या सामन्यानंतर मोदींनी भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराशी बातचीत केली. त्यांनी पूर्ण टूर्नामेंट चांगलं प्रदर्शन केल्याबद्दल संघाच अभिनंदन करत पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. याआधी सामना सुरु असताना  पीएम मोदी (PM Narendra Modi) यांनी एक ट्विट केलं होतं, ‘मी भारत आणि बेल्जियम हॉकी पुरुष सेमीफायनल पाहत आहे. मला आपल्या संघावर गर्व आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा’.

सुवर्णपदकाची प्रतिक्षा वाढली

टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून 5-2 च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आणि त्यासोबतच बेल्जियम फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ पोहोचला. तर भारताची सुवर्णपदकासह रौप्यपदकाची यंदाच्या ऑलिम्पिकमधील आशा संपली आहे. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळून भारतीय संघ कांस्य पदक मिळवण्याचा प्रयत्न करणार असला तरी सुवर्णपदकाची प्रतिक्षा मात्र आणखी एका ऑलिम्पकसाठी वाढली आहे.

1980 मध्ये मिळवलं होत शेवटचं पदक 

1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारतीय पुरुष हॉकी संघ प्रथमच सुवर्णपदकाच्या इतक्या जवळ पोहोचला होता. 1980 मध्ये भारताने हॉकीमध्ये शेवटचं सुवर्णपदक जिंकल होतं. हॉकी खेळात भारताकजे आठ ओलिम्पिक सुवर्णपदकं आहेत. यंदा किमान कांस्य पदक भारत जिंकेल अशी आशा भारतीय करत आहेत.

संबंधित बातम्या 

Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत

Women’s Hockey : गोलकीपर सविताने भिंत बनून हल्ले परतवले, गुरजीतने वाऱ्याच्या वेगाने गोल केला, भारत सेमी फायनलमध्ये

(Men hockey team gave its best says PM modi after belgium Hockey team defeated India 5-2 in semi final)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI