Tokyo Olympics 2021: ऑलिम्पिकमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान, दोन धुरंधर आमने-सामने, असा असेल सामना

भारताकडून नीरज चोप्राने भाला फेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत फायनलमध्ये जागा मिळवली आहे. भारताला पदक मिळवून देण्यासाठी नीरज एक प्रबळ दावेदार आहे.

Tokyo Olympics 2021: ऑलिम्पिकमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान, दोन धुरंधर आमने-सामने, असा असेल सामना
नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 12:46 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी दोन्ही देशांचे भाला फेक स्पर्धा खेळणारे दोन खेळाडू आपआपल्या देशासाठी पदक जिंकण्याकरता आमने सामने येणार आहेत. कायम क्रिकटमधील कट्टर प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही संघा आता ऑलिम्पिकमध्येही भिडणार आहेत. यावेळी भारताकडून भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि पाकिस्तानकडून अर्शद नदीम (Arshad Nadeem)  हे दोघे आमने-सामने असतील.

आज (4 ऑगस्ट) नीरज आणि अर्शद यांनी भालाफेक स्पर्धेच्या पात्रता फेरीत अप्रतिम कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला.  नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर लांब भाला फेकला. ज्यामुळे तो थेट फायनलमध्ये पोहोचला. तर  नदीमने देखील 85.16 मीटर लांब भाला फेकत फायनलचं तिकिट मिळवलं.

7 ऑगस्टला रंगणार फायनल

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचे लक्ष या फायलनवर असणार आहे. नीरज हा भारतासाठी पदक मिळवून देणारा प्रबळ दावेदार आहे.  त्यामुळे संपूर्ण देश त्याच्या सामन्याकडे लक्ष देऊन आहे. अशीच काहीशी आशा पाकिस्तानला ही अर्शदकडून आहे. 7 ऑगस्टला जपानची राजधानी टोक्योमध्ये भालाफेकता अंतिम सामना खेळवला जाईल. नीरज आणि नदीमसह एकूण 12 खेळाडू फायनल खेळणार आहेत.

नीरज आहे अर्शदची प्ररेणा

पाकिस्तानचा नदीम आधी क्रिकेट खेळत होता. पण त्यानंतर त्याने एथलेटिक्स खेळायला सुरुवात केली. 2018 च्या आशियाई खेळांमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर त्याने नीरजसला खेळताना पाहून भालाफेक खेळण्यास सुरुवात केल्याचा खुलासा केला होता. आता टोक्यो ऑलिम्पिक या महान स्पर्धेत दोघेही आमने-सामने असणार असल्याने त्याच्या खेळाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: नीरज चोप्राचा ऐतिहासिक थ्रो, मिळवलं फायनलचं तिकिट, भारताला पदकाची आशा

Tokyo Olympics 2021: भारताच्या खिशात आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरलं नाव

Women’s Hockey : गोलकीपर सविताने भिंत बनून हल्ले परतवले, गुरजीतने वाऱ्याच्या वेगाने गोल केला, भारत सेमी फायनलमध्ये

(Neeraj chopra and Arshad nadeem will face eachother at javelin throw final in tokyo olympics India vs pakistan at olympic)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.