सन्मान समारंभ नीरज चोप्रासाठी ठरले अडचणीचे, सराव सुरु करण्यास विलंब, डायमंड लीगलाही हुकणार

भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला. एथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी नीरज चोप्राचा सन्मान केला जात आहे.

सन्मान समारंभ नीरज चोप्रासाठी ठरले अडचणीचे, सराव सुरु करण्यास विलंब, डायमंड लीगलाही हुकणार
नीरज चोप्रा

नवी दिल्ली : टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) नाव मागील काही दिवसांपासून सर्वत्र ऐकायला मिळत आहे. अगदी काही वेळातच नीरज भारतातील सर्व खेड्यापाड्यात पोहचला आहे. सोशल मीडियावरही त्याचीच हवा आहे. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी पंतप्रधान मोदींपासून (PM Modi) अनेकांनी त्याचा सन्मान केला. पण हेच सन्मान समारंभ नीरजला महाग पडले आहेत.

मागील काही दिवस सतत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यामुळे नीरजचं डायट, सराव सारकाही बिघडंल असून त्याची प्रकृतीही थोडी खालावली होती. ज्यामुळे त्याला आगामी डायमंड लीगमधूनही माघार घ्यावी लागली आहे. त्याच्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची होती. पण प्रकृती ठिक नसल्याने त्याने माघार घेण्याचा निर्णय़ घेतला आहे.

डायमंड लीगमधून नीरजची माघार

नीरज चोप्रा सोबतचे सर्व सहखेळाडू हे ऑलिम्पिकनंतर त्यांच्या सीजनची सुरुवात करत आहेत. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरजलाही डायमंड लीगमध्ये सहभाग घेत सीजनची सुरुवात करायची होती. त्याने ऑलिम्पिकपूर्वी तसा प्लॅन देखील केला होता. पण सततच्या शुभेच्छा कार्यक्रमांमुळे नीरजचं त्याच्या डायटवरील लक्ष कमी झालं आहे. मध्यंतरी त्याला सर्दीही झाली होती. त्यामुळे तो सरावापासून दूर गेला आहे. ज्यामुळे त्याने डायमंड लीगमध्ये खेळणार नसल्याचं जाहीर केलं.

नीरजवर बक्षिसांचा वर्षाव

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवल्यानंतर नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत होता. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून यात रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसं आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि सीएसके संघाने नीरजला एक कोटी रुपये रोख रकम बक्षिस म्हणून दिली आहे. तर इंडिगो एअरलाईन्सने देखील नीरजला सुवर्णपदक विजयानंतर एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

गुरुग्राम येथील एका रिअल इस्टेट कंपनीने नीरजला 25 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं आहे. याशिवाय बांगड़ सिमेंट कंपनीने घर बांधण्यासठी मोफत सिमेंटची घोषणा देखील केली आहे.नीरज चोप्राला महिंद्रा ग्रुपतर्फे नुकतीच मार्केटमध्ये आलेली कार XUV700 देण्याची घोषणा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत केली. या सर्वांसह हरियाणा सरकारने 6 कोटी रुपयांचं बक्षीस आणि क्लास वन दर्जाची नोकरी नीरजला देऊ केली आहे. पंजाब आणि मणिपुर सरकारनेही नीरजला बक्षिसाची घोषणा केली आहे.

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(Neeraj chopra had to withdraw from diamond league due illness came from attending many functions)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI