Tokyo Olympics 2021: असा एक फायनलचा खेळ ज्यात भारताचा खेळाडूच नाही, 25 वर्षानंतर पहिल्यांदाच नामुष्की!

तब्बल 25 वर्षानंचर ऑलम्पिकच्या इतिहासात पहिल्यादांच 'या' खेळाच्या फायनलमध्ये भारताचा पुरुष किंवा महिला असा एकही खेळाडू खेळताना दिसणार नाही.

Tokyo Olympics 2021: असा एक फायनलचा खेळ ज्यात भारताचा खेळाडूच नाही, 25 वर्षानंतर पहिल्यांदाच नामुष्की!
टोकियो ऑलम्पिक

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळांना सुरुवात होताच दुसऱ्या दिवशीच भारताला महिला वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने (Mirabai Chanu) रौप्य पदक जिंकवत सर्वांचाच जोश वाढवला. पण दुसरीकडे भारताची वजनदार बाजू असणार्या निशानेबाजी (Shooting) खेळामध्ये भारताला मोठी निराशा पत्करावी लागली आहे. ही निराशा भारताला निशानेबाजीच्या 10 मीटर एअर रायफल (10 m Air Rifle) स्पर्धेत पत्करावी लागली आहे. कारण तब्बल 25 वर्षानंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या या स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा एकही पुरुष किंवा महिला खेळाडू खेळताना दिसणार नाही.

साल 1996 नंतर पहिल्यांदाच असे झाले आहे की, भारत निशानेबाजीमधील 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत महिला आणि पुरुष अशा दोन्ही वर्गातून एकाही जागी फायनलमध्ये जागा मिळवू शकलेला नाही. भारताच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही वर्गातील खेळाडूंना पात्रता फेरीतच पराभव पत्करावा लागला आहे.

अँटलांटा ऑलिम्पिकची पुनरावृत्ती

टोक्यो ऑलिम्पिकमधील दुसऱ्या दिवशीच भारताच्या महिला निशानेबाज 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनल साठी क्वॉलिफाय करु शकल्या नाहीत. तर तिसऱ्या दिवशी तशीच परिस्थिती पुरुष वर्गातही दिसून आली. ज्याप्रमाणे अपूर्वी आणि इलावेनिल या दोघींच्या पदरी निराशा आली तशीच निराशा दिव्यांश पवार आणि दीपक कुमार यांच्या हाती लागली. याआधी भारत 1996 च्या अँटलांटा ऑलिम्पकमध्येही 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचू शकला नव्हता.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021: शानदार! अवघ्या 28 मिनिटात सिंधू विजयी, सलामीच्या सामन्यात विजयाने सुरुवात

रिओमध्ये हुलकावणी, डिप्रेशनने गाठलं, मात्र टोकियोमध्ये कमाल केली, मीराबाईच्या रौप्य विजयाच्या 10 खास गोष्टी

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

(Not single indian Player is playing in Finals of shooting game at tokyo olympics for first time in 25 years)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI