पंतप्रधान मोदींनी हॉकी सेमीफायनल मॅच पाहिली आणि भारत हरला, लोकं मोदींना म्हणाले, ‘पनवती’, ट्विटरवर #panauti ट्रेंड

टोक्यो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमने 5-2 ने पराभूत केलं. या पराभवामुळे भारतीय संघाचं यंदा सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्नही तुटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी हॉकी सेमीफायनल मॅच पाहिली आणि भारत हरला, लोकं मोदींना म्हणाले, 'पनवती', ट्विटरवर #panauti ट्रेंड
भारतीय पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय पुरुष हॉकी संघ तब्बल 49 वर्षानंतर म्हणजेच 1972 नंतर सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. पण बेल्जियम संघाने 5-2 च्या फरकाने भारताला पराभूत करत सुवर्णपदकाचं स्वप्नही तोडलं. पण या पराभवानंतर नेटकऱ्यांनी थेठ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. सामना सुरु असताना तो पाहत असल्याचं ट्विट मोदींनी केलं होत. त्यामुळे त्यांनी सामना पाहिल्यानेच भारत पराभूत झाला, असं म्हणत काही नेटकऱ्यांनी #Panauti हा ट्रेंड रत भारताच्या पराभवाला मोदींना जबाबदार धरलं.

सेमीफायनलच्या सामन्यानंतर मोदींनी ट्विट करत भारताच्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवलं. पूर्ण टूर्नामेंट चांगलं प्रदर्शन केल्याबद्दल संघाचं अभिनंदन करत पुढील सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. पण त्यापूर्वी सामना सुरु असताना पीएम मोदी (PM Narendra Modi) यांनी एक ट्विट केलं होतं, ‘मी भारत आणि बेल्जियम हॉकी पुरुष सेमीफायनल पाहत आहे. मला आपल्या संघावर गर्व आहे. त्यांना खूप-खूप शुभेच्छा’.

दरम्यान, मोदींच्या या ट्विटलाच व्हायरल करत नेटकरी मोदींनी सामना पाहिला म्हणून मॅच हारली असं म्हणत त्यांना ट्रोल केलं. ज्याला याआधी चंद्रयाण 2 चा संदर्भ देत त्यावेळी देखील मोदींनी त्याठिकाणी जाताच मिशन अयशस्वी झाल्याचं काहींनी म्हटलं…

भारत कांस्य पदकासाठी खेळणार

टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनलमध्ये बेल्जियमकडून 5-2 च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आणि त्यासोबतच बेल्जियम फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ पोहोचला. तर भारताची सुवर्णपदकासह रौप्यपदकाची यंदाच्या ऑलिम्पिकमधील आशा संपली आहे. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळून भारतीय संघ कांस्य पदक मिळवण्याचा प्रयत्न करणार असला तरी सुवर्णपदकाची प्रतिक्षा मात्र आणखी एका ऑलिम्पकसाठी वाढली आहे.

संबंधित बातम्या 

Tokyo Olympic 2021: हॉकी संघाच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले…

Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत

Women’s Hockey : गोलकीपर सविताने भिंत बनून हल्ले परतवले, गुरजीतने वाऱ्याच्या वेगाने गोल केला, भारत सेमी फायनलमध्ये

(Panauti trend Viral on Twitter after PM Modi watched Team indias defeat in semi final against Belgium)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI