Tokyo Olympics 2020 : भारतीय खेळाडूंचा जोश वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा नवा उपक्रम, आज सायंकाळी साधणार संवाद

टोक्यो ऑलम्पिक 2020 (Tokyo Olympic 2020) स्पर्धेसाठी भारताकडून 100 हून अधिक खेळाडू क्वॉलिफाय झाले आहेत. 17 जुलैला हे खेळाडू टोक्योसाठी रवाना होणार आहेत.

Tokyo Olympics 2020 : भारतीय खेळाडूंचा जोश वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा नवा उपक्रम, आज सायंकाळी साधणार संवाद
ऑलम्पिक खेळणाऱ्या भारतीयांना मोदीजी देणार शुभेच्छा

नवी दिल्ली : लवकरच टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धांना जपानच्या टोक्यो शहरात सुरुवात होणार आहे. या स्पर्धांसाठी सर्व देश आपले आघाडीचे खेळाडू पाठवत आहेत. भारताचे शिलेदारही टोक्यो ऑलम्पिकसाठी (Tokyo Olympics) 17 जुलैला रवाना होणार आहेत. संपूर्ण भारत खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी #cheer4india नावाचे अभियान देखील सुरु केले आहे. आता मोदीजी या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सायंकाळी 5 वाजता खेळाडूंना संबोधित करणार आहेत.

या बद्दल नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्यांच्या ट्विटरवरुन माहिती दिली आहे. या संबोधनादरम्यान मोदीजी खेळाडूंशी संवादही साधणार आहेत. तसेच खेळाडूंच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दलही मोदीजी जाणून घेणार आहेत. खेळाडूंनी ऑलम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करुन देशासाठी पदक पटकवावे यासाठी मोदीजी त्यांचा जोश वाढवण्याच्या दृष्टीने हा संवाद साधतील.

18 खेळांध्ये 126 खेळाडू खेळणार

टोक्यों ऑलम्पिकमध्ये एकूण 18 प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय  खेळाडू सहभाग घेणार आहेत. यावेळी स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंची एकूण संख्या 126 आहे.  ही आतापर्यंत भारताकडून ऑलम्पिकमध्ये पाठवण्यात आलेली सर्वाधिक संख्या आहे. यावेळी भारताला ऑलम्पिकमध्ये सर्वाधिक पदक मिळण्याची शक्यता निशानेबाजी, तिरंदाजी आणि कुस्ती या खेळात आहे. भारतीय हॉकी संघाची कामगिरी पाहता त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.  भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी टोक्यो ऑलम्पिकपूर्वीच जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आली असल्याने देशाला तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

क्रिकेटपटूंनी दिल्या शुभेच्छा

बीसीसीआयने त्यांच्या ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी ऑलम्पिकसाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.  या ट्वि्टमध्ये भारताचे आघाडीचे क्रिकेटपटू खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. तसेच सर्वांनी खेळाडूंना सपोर्ट करुन शुभेच्छा द्या असे कॅप्शनही बीसीसीआयने या व्हिडीओला दिले आहे. या व्हिडीओमध्ये मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, जेमिमा रोड्रिग्स, अजिंक्य रहाणे, हरलीन देओल हे भारतीय क्रिकेटपटू शुभेच्छा देत आहेत.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 : 5 व्या वर्षी अनाथ, मजुरी करणाऱ्या आजीने सांभाळलं, सरावासाठी शूजही नव्हते, आता भारताकडून ऑलम्पिक गाजवणार

Tokyo Olympics 2020 : 40 वर्षांची प्रतिक्षा संपणार, यावेळी भारतीय हॉकी टीम ‘GOLD’ मिळवणारच!

Tokyo Olympics साठी भारतीय बॉक्सर सज्ज, ‘या’ खेळाडूंकडून पदक मिळवण्याची सर्वाधिक आशा

(PM Narendra Modi Will Interact With Indian Athletes who Going to Tokyo Olympic 2020)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI