Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा यामागुचीवर विजय, सेमी फायनलचं तिकीटं मिळवत पदकाच्या अगदी जवळ

सिंधूने उपांत्य पूर्व फेरीत जपानच्या यामागुचीला नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. या विजयासोबतच सिंधू पदकाच्या आणखी एक पाऊल जवळ गेली आहे.

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचा यामागुचीवर विजय, सेमी फायनलचं तिकीटं मिळवत पदकाच्या अगदी जवळ
पीव्ही सिंधू
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 3:53 PM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) बॅडमिंटन कोर्टवर भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या यामागुचीला नमवलं आहे. या विजयासह सिंधूने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

सिंधूने पहिला सामना 23 मिनिटांत संपवला. सामना तिने 21-13 च्या फरकाने खिशात घातला. सुरुवातीपासून सामन्यात दोघींमध्ये चांगली चुरस दिसून आली. दोघीही 6-6 च्या स्कोरवर असताना सिंधूने आक्रमक पवित्रा घेत सामन्यात आघाडी घेतली. दुसरा सेट अटीतटीचा झाला. 56 मिनिटं चाललेल्या दुसऱ्या सेटमध्ये यामागुचीने पुनरागमन करत 16-16 ने बरोबरी साधली. पण अखेर सिंधूने पुन्हा पुनरागमन करत सामना 22-20 ने विजय जिंकला.

यामागुचीवर सिंधूचा 12 वा विजय

भारताच्या पीव्ही सिंधूने दुसऱ्या गेममध्ये अप्रतिम खेळ केला. पण यामागुचीने देखील चांगली टक्कर देत सामन्यात बरोबरी साधली. पण अखेर सिंधूने सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला. याआधीही सिंधूने अनेकदा यामागुचीला नमवलं आहे. बॅडमिंटन कोर्टवर 19 वेळा सिंधू आणि यामागुची आमने-सामने आले भिडले असून 12 वेळा सिंधूने विजय मिळवला असून आजच्या विजयासह तिने विजयी मालिका कायम ठेवली.

अशी असेल सेमीफायनलमधील लढत

पीव्ही सिंधूने आता सेमीफायनलमध्ये जागा मिळवली असून सेमीमध्ये तिची लढत अजून कोणासोबत असेल हे नक्की झालेले नाही. आता थायलंडच्या रत्नाचोक आणि चीनी ताइपेची ताई त्जु यिंग यांच्यात उपांत्यूपूर्व फेरीचा सामना होणार असून यातील विजेत्यासोबत सिंधू सेमी फायनलचा सामना लढेल. सिंधूसाठी चीनी ताइपेच्या खेळाडूसोबत सामना लढणे अवघड असणार आहे. कारण दोघी आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात सिंधू केवळ 5 सामने जिंकली असून ताई त्जु यिंगने 13 सामने जिंकले आहेत.

(PV Sindhu vs akane Yamaguchi quarter final match won by Sindhu enters in semi final)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.