ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर चावतात का? ‘हे’ आहे मजेशीर कारण

जगातील सर्वात मानाची आणि मोठी स्पर्धा असणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पण अनेकजण हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मिळालेल्या पदकाचा चावा घेतात, हे असं का करतात माहित आहे?

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर चावतात का? 'हे' आहे मजेशीर कारण
भारतीय पैलवान साक्षी मलिक
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 6:01 PM

Tokyo Olympics : नुकतीच टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic 2021) स्पर्धा पार पडली. भारताने ऐतिहासिक कामगिरी करत यंदा 7 पदक पटकावली. पदक जिंकण्याचा आनंद हा सर्व खेळाडूंसह देशवासियांच्या चेहऱ्यावर झळकत होता. तर हे असे आनंद देणारे पदक मिळाल्यानंतर त्याला चावून का पाहिले जाते? याच्या मागे असणारे एक साधे सोपे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपण आतापर्यंत अनेक खेळाडूंना ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर ते दातांनी चाऊन पाहताना पाहिलं आहे. त्यावेळी हे खेळाडू असं का करतात (Why olympians bite medal) फक्त फोटोसाठी ही पोज आहेका? की यामागे काही कारण आहे? या सर्वाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर या रंजक गोष्टीमागे एक अत्यंत सोप कारण आहे.  स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूला सुवर्णपदक दिलं जात. त्यानंतर अनेकजण त्याचा चावा घेत फोटो काढतात. यामागील कारण म्हणजे ते पदक नेमकं कशाप्रकारच्या सोन्याचं आहे हे माहित करुन घेण्यासाठी असे केले जाते. कारण जे सुवर्णपदक दिलं जात ते शुद्ध सोन्याचा वापर करून तयार करतात. सोन इतर धातूंच्या तुलनेत नरम असतं. त्यामुळे सुवर्णपदकाचा चावा घेतल्यात त्याच्या दातांचे व्रण त्या पदकावर उमटत. ज्यामुळे सोन्याची क्वॉलीटी तपासण्यासोबत पदकावर आपली छाप सोडण्यातही खेळाडूला यश येतं. पण आजकाल फोटोची पोज म्हणून कोणतंही पदक मिळाल्यास त्याचा चावा घेताना फोटो काढला जातो. भारताकडून रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवल्यानंतर पैलवान साक्षी मलिकने देखील त्याचा चावा घेताना फोटो काढला होता.

आता सुवर्णपदकात चांदीच अधिक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने केवळ एक सुवर्णपदक पटकावलं. भालाफेक खेळात 23 वर्षीय नीरज चोप्राने हे सुवर्णपदक मिळवलं. दरम्यान यंदा ऑलिम्पिकमध्ये देण्यात आलेल्या  सुवर्णपदकात केवळ सहा ग्रॅम सोनं होतं. त्यामुळे एकूण556 ग्रॅम वजनाच्या सुवर्णपदकात 550 ग्रॅम चांदीच होती.

भारताने यंदा सात पदकांवर कोरलं नाव

टोक्योमध्ये भारताला मिळालेल्या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.

मानसिक तणावामुळे हवी तशी कामगिरी करता आली नाही, Tokyo Olympics मध्ये पराभवानंतर पैलवान विनेशचा मोठा खुलासा

Tokyo Olympics मध्ये शिस्तभंग केल्याप्रकरणी पैलवान विनेश फोगाट निलंबित, भारतीय रेसलिंग फेडरेशनची धडक कारवाई

(Read why Olympians bite their medals after winning when clicking pictures)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.