मलिश्का म्हणते, ‘मै तुम्हें जादू की झप्पी देना चाहती हुँ’, बघा नीरज चोप्राचं उत्तर, देशातला सर्वाधिक व्हायरल व्हिडीओ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 20, 2021 | 6:19 PM

भारतभर ज्याच्या नावाचा डंका वाजत आहे अशा सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिश्काने मिठी मारण्याची इच्छा जाहीर केली आहे. ज्यावर नीरजने दिलेली रिएक्शन पाहण्याजोगी आहे.

मलिश्का म्हणते, 'मै तुम्हें जादू की झप्पी देना चाहती हुँ', बघा नीरज चोप्राचं उत्तर, देशातला सर्वाधिक व्हायरल व्हिडीओ
आरजे मलिश्का आणि नीरज चोप्रा

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये (Tokyo Olympics) भारताला सुवर्णपदक जिंकवून देत इतिहास रचणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) मागील काही दिवसांपासून तरुण-तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला आहे. खासकरुन तरुणी तर नीरजवर जाम फिदा झाल्या असून सोशल मीडिया नीरजच्या फोटोनीं न्हावून गेलं आहे. ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरी इतकाच प्रत्यक्षात सुंदर दिसणारा अगदी हिरो मटेरियल नीरजची प्रसिद्ध रेडिओ जॉकी मलिश्काही फॅन झाली आहे. तिने झूम मीटिंगमध्ये नीरजला थेट जादूकी झप्पी अर्थात मिठी मारण्याची इच्छा दर्शवली. ज्यावर नीरजनं दिलेलं उत्तरही एकदम भारी आहे. या सर्वाचा एक छोटासा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

तर या व्हिडीओमध्ये मलिश्का नीरजला, ‘मी तुला जादूजी झप्पी देऊ इच्छिते’ असं म्हणते. ती अगदी कॅमेऱ्याजवळ जाऊन मी इथूनच मिठी मारण्याचा प्रयत्न करत आहे असंही दाखवते. ज्यावर नीरजही दुसऱ्या बाजूने ‘मीही दूरुनच नमस्ते करतो’ असं म्हणत अगदी सोज्वळपणे तिच्या मागणीचा मान राखताना दिसत आहे. तर या व्हिडीओमधील नीरजची क्यूट स्माईल आणि त्याहूनही क्यूट रिएक्शन तुम्हीही पाहाच…

नीरजसाठी मलिश्का मैत्रीणींसह थिरकली

या झूम मीटिंग दरम्यान नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याच्या स्वागतासाठी आरजे मलिश्काने तिच्या मैत्रिणी, सहकारी यांच्यासोबत डान्स करत नीरजचं मनोरंजन आणि अभिनंदन करण्याचा प्रयत्न केला होता. ‘उडे जब जब झुल्फे तेरी.’ या गाण्यावर मलिश्काने डान्स केला असून हा हटके स्वागताचा व्हिडीओही मलिश्कानं ट्वीटरवर पोस्ट देखील केला आहे.

इतर बातम्या

Video: उडे जब जब झुल्फें तेरी, पोरींचा घोळका झूम मिटींगवरच नीरज चोप्रासमोर नाचायला लागला

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

(RJ Malishka asks Neeraj chopra for hug in words of Jadoo ki Jhappi chopras reply is watchable)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI