VIDEO : भारताला Tokyo Paralympic मध्ये रौप्य पदक मिळवून देणारी निशादची ऐतिहासिक उडी, एकदा पाहाच!

भारताने रविवारी दिवसभरात उत्कृष्ट कामगिरी करत टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये तीन पदकं खिशात घातली. यामध्ये दोन रौप्य पदकांसह एका कांस्य पदकाचाही समावेश आहे.

VIDEO : भारताला Tokyo Paralympic मध्ये रौप्य पदक मिळवून देणारी निशादची ऐतिहासिक उडी, एकदा पाहाच!
निशाद कुमार
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 6:46 PM

Tokyo Paralympics 2020: टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) भारतासाठी आजचा दिवस फार भारी ठरला. भारताने आज दोन रौप्य पदकांसह एक कांस्य पदक खिशात घातलं. यामध्ये उंच उडी स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या निशाद कुमारची (Nishad Kumar) ऐतिहासिक उडी सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. या उडीच्या व्हिडीओजनी इंटरनेट अगदी न्हावून गेलं आहे. निशादने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत 2.06 मीटर उडी घेत पदक पटकावलं. यासोबतच त्याने आशिया खंडातील उंच उडी रेकॉर्डशी देखील बरोबरी केली आहे.

निशादच्या या उडीचे कौैतुक सर्वत्र होत आहे. त्याच्या या उडीचा व्हिडीओही अनेकजण पोस्ट करत आहेत. नरेंद्र मोदींपासून ते राहुल गांधी अशा साऱ्यांनीच निशादला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेटपटूंसह ऑलिम्पिक पदक विजेते नीरजचा शुभेच्छा देत आहेत. तर भारताला चकचकीत रौप्य पदक मिळवून देणारी उडी तुम्हीही पाहा…

अशी झाली स्पर्धा

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत अमेरिकेचा टाउनसेंड रोडेरिक याने 2.15 मीटरची उडी टाकत सुवर्ण पदक जिंकलं. विशेष म्हणजे त्याने एक नवं जागतिक रेकॉर्डही सेट केले. तर दुसऱ्या स्थानावर भारताच्या निशादने 2.06 मीटर उंच उडी टाकली. यानंतर तिसऱ्या स्थानावर अमेरिकेचाच विसे डलास राहिला. त्याने कांस्य पदक पटकावलं.

रामपाल पाचव्या स्थानावर

निशादसह भारताचा आणखी एक खेळाडू जो या स्पर्धेत सहभागी होता त्या रामपालने पाचवं स्थान पटकावलं. त्याने 1.94 मीटरची उंच उडी घेत पाचवं स्थान मिळवलं. तो पदक जिंकू शकला नसला तरी त्याने त्याचा स्वत:चाच पूर्वीचा रेकॉर्ड मात्र ब्रेक केला आहे.

हे ही वाचा :

Tokyo Paralympics 2020 : भारतावर पदकांचा वर्षाव, दिवसभरातील तिसरं पदक, थाळीफेक स्पर्धेत विनोद कुमारचं यश

Tokyo Paralympics 2020 : भारताच्या खिशात आणखी एक पदक, निषाद कुमारने उंच उडीत जिंकलं रौप्य पदक

Tokyo Paralympics 2020: भाविनाने देशासह कुटुंबियांना समर्पित केलं पदक, नातेवाईकांनी गरबा खेळत साजरा केला विजय

(See Video of Indias high jumper nishad kumar which won Silver Medal in tokyo paralympics 2020)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.