Tokyo Olympics 2020 मध्ये खेळण्याबाबत नोव्हाक जोकोविच याचे मोठे वक्तव्य, म्हणाला…

इटलीच्या मातेयो बेरेट्टिनीला नमवत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाकने सहावे विम्बल्डन आणि 20 वे ग्रँड स्लॅम जिंकले. आता यानंतर त्याच्यासमोर ऑलम्पिक खेळांचे आव्हान असून त्याबद्दल त्याने एक मोठे वक्तव्य केले आहे.

Tokyo Olympics 2020 मध्ये खेळण्याबाबत नोव्हाक जोकोविच याचे मोठे वक्तव्य, म्हणाला...
नोव्हाक जोकोविच
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 5:52 PM

लंडन : वर्षाच्या सुरुवातीपासून दमदार कामगिरी करणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) आपली विजयी घोडदौड सुरुच ठेवत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावरही नाव कोरले आहे. याआधी ऑस्ट्रेलियन ओपन मग फ्रेंच ओपन आणि आता विम्बल्डन स्पर्धा जिंकल्यामुळे नोव्हाकने यंदा टेनिस विश्वावर एकहाती सत्ता मिळवली आहे. आता त्याच्यापुढे युएस ओपन आणि टोक्यो ऑलम्पिक खेळांचे (Tokyo Olympic 2020) आव्हान आहे. दरम्यान युएस ओपनआदी ऑलम्पिक खेळ असल्याने याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने दिलेल्या उत्तरांवरुन तो अजूनपर्यंत कोणत्याच निर्णयावर पोहोचला नसल्याचे स्पष्ट होते. (Serbian TennisStar Novak Djokovic Not sure about Playing in Tokyo Olympics 2020)

34 वर्षीय नोव्हाक सध्या जगातील नंबर एकचा टेनिसपटू आहे. त्यामुळे टोक्यो ऑलम्पिकमध्ये तो खेळेल का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यावर नोव्हाकला विचारणा केली असता तो म्हणाला, ”मी आतापर्यंत याबद्दल काही विचार केलेला नाही. मला ऑलम्पिक स्पर्धेत (Olympic Games) खेळण्याची इच्छा आहे. पण मी याबाबत अजूनही विचार करत असल्याने काही निर्णय घेतलेला नाही.” टोक्यो ऑलम्पिकमध्ये आयोजकांनी कोरोनामुळे दर्शकांच्या एन्ट्रीवर निर्बंध लावल्याने नोव्हाकची स्पर्धेत खेळण्याची इच्छा कमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.

सहाव्यांदा विम्बल्डनमध्ये विजय

विम्बल्डन स्पर्धेचा अंतिम सामना नोव्हाक आणि इटलीच्या मातेयो बेरेट्टिनी (Matteo Berrettini) यांच्यात झाला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये मातेयो याने 6-7 च्या फरकाने विजय मिळवत आघाडी घेतली. पण नंतर नोव्हाकने दमदार पुनरागमन करत पुढील तिन्ही सेट्स 6-4, 6-4 आणि 6-3 च्या फरकाने जिंकत विजय मिळवला. तब्बल 3.24 तास हा रंगतदार सामना सुरु होता. नोव्हाकच्या या विजयासह मातेयो याचे स्वत:चे पहिले ग्रँड स्लॅम आणि देशाचे पहिले विम्बल्डन टायटल मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. हा विजय मिळवताच नोव्हाकने कारकिर्दीतील 6 वे विम्बल्डन आपल्या नावे केले. विशेष म्हणजे हे त्याचे 20 वे ग्रँड स्लॅम असल्याने त्याने रॉजर फेडरर (Roger Fedrar) आणि राफेल नदाल (Rafeal Nadal) यांच्या सर्वाधिक 20 ग्रँडस्लॅम मिळवण्याच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली आहे.

हे ही वाचा – 

Wimbledon 2021, Men’s Final: नोव्हाक जोकोविचची विजयी घोडदौड सुरुच, फ्रेंच ओपननंतर विम्बल्डनमध्येही विजय

Wimbledon 2021, Women’s Singles Final : विम्बल्डनची नवी राणी, क्रिकेटपटू अश्र्ले बार्टीचा इतिहास, प्लिस्कोवाला नमवत विजेतेपदावर नाव कोरलं

EURO 2020 : इंग्लंडची कडवी झुंज अपयशी, युरो चषक इटलीच्या नावे!

(Serbian TennisStar Novak Djokovic Not sure about Playing in Tokyo Olympics 2020)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.