Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचा सेमीफायनल सामना पाहण्यासाठी सर्वच उत्सुक,आसाम विधानसभेचं कामकाजही 30 मिनिटांपर्यत स्थगित

भारताची महिला बॉक्सर लवलीनाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वेल्टरवेट कॅटेगरीत उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचा सेमीफायनल सामना पाहण्यासाठी सर्वच उत्सुक,आसाम विधानसभेचं कामकाजही 30 मिनिटांपर्यत स्थगित
लवलीना बोरगोहेन
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 10:09 AM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) भारताने दोन पदकं मिळवली असून तिसरं पदक पक्कं केलं आहे. भारताची बॉक्सर लवलीना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे बॉक्सिंगच्या नियमांनुसार तिला किमान कांस्य पदक मिळाणार आहे. पण या पदकाला रौप्य किंवा सुवर्ण करण्यासाठी आज ती सेमीफायनलचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.

काही वेळात सुरु होणाऱ्या लवलीनाच्या सामन्यासाठी संपूर्ण भारत देश उत्सुक असून लवलीनाचं राज्य असणाऱ्या आसाममधील सर्व आमदारही तिचा सामना पाहणार आहेत. ज्यासाठी विधानसभेचं कामकाज अर्धा तास थांबवण्यात येण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार आसाम विधानसभेच्या स्पीकर डॉ. नुमाल मोमिन यांनी सांगितलं की, कामकाज काही काळ थांबवण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

किक बॉक्सिंग सोडून बनली बॉक्सर

भारतासाठी ऑलिम्पिक पदक निश्चित करणारी लवलीना आधीपासून बॉक्सर नव्हती. ती आधी किक बॉक्सिंग करायची. तिच्या दोन मोठ्या बहिनी लीमा आणि लीचा या देखील किक बॉक्सर आहेत. त्यामुळे तिनेही किक बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली होती. पण नंतर तिला खास कामगिरी करता न आल्याने तिने SAI ने ठेवलेल्या बॉक्सिंग ट्रायलमध्ये भाग घेतला. लवलीनाने 2012 पासून बॉक्सिंगची ट्रेनिंग सुरु केली. त्यानंतर मागील 9 वर्षांच्या मेहनतीची फळ तिला आज मिळाले आहे.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

(To watch boxer lovlina borgohain semi final match assam assembly proceedings postponed for half hour)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.