Tokyo Olympic 2021 : हॉकी सेमी फायनल सामन्यात भारताचा पराभव, बेल्जियमचा 5-2 ने विजय, भारताला आता कांस्य पदकाची आशा

रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने भारताचा 5-2 ने पराभव करुन फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताला आता कांस्य पदकासाठी खेळावं लागणार आहे.

Tokyo Olympic 2021 : हॉकी सेमी फायनल सामन्यात भारताचा पराभव, बेल्जियमचा 5-2 ने विजय, भारताला आता कांस्य पदकाची आशा
सेमी फायनल सामन्यात बेल्जियमकडून भारताचा पराभव
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 10:05 AM

Tokyo Olympic 2020 : टोकियो ऑलिम्पिकमधल्या हॉकीच्या सेमीफायनच्या रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने भारताचा 5-2 ने पराभव केला आहे. बेल्जियमने भारताचा 5-2  असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारतीय संघाचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. मात्र, तरीही संघ कांस्यपदकाचा दावेदार आहे.

बेल्जिअमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारतानेही लगोलग गोल करुन बेल्जिअमशी बरोबरी केली. लगोलग भारताने दुसरा गोल केला. पण त्यानंतर बेल्जियमने भारताला गोल करुच दिला नाही. बेल्जिअमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला. भारताने बेल्जियमशी दोन हात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण अखेर बेल्जिअमने भारताचा 5-2  असा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताला आता कांस्य पदकासाठी खेळावं लागणार आहे.

भारताचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं

भारतीय संघाचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. मात्र, तरीही संघ कांस्यपदकाचा दावेदार आहे. भारताने पहिल्या हाफमध्ये चांगला खेळ केला. तर बेल्जियम शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताला खूपच वरचढ ठरला. पेनल्टी कॉर्नर हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे.

भारताला आता कांस्य पदकासाठी खेळावं लागणार आहे. भारतीय संघ कांस्यपदकासाठी जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पराभूत संघाचा सामना करेल. सेमी फायनलमध्ये विजय मिळवता आला नाही पण आता भारतीय संघाने कांस्य पदक तरी जिंकावं, अशीच अपेक्षा भारतीय फॅन्स करत आहेत.

(Tokyo olympic 2020 live update belgium Hockey team defeated India 5-2)

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.