Tokyo Olympic 2020 Live : भारतीय महिला हॉकी संघ पुन्हा पराभूत, जर्मनीचा 2-0 ने विजय

| Updated on: Jul 26, 2021 | 9:09 PM

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचा (Tokyo olympic 2020) आज चौथा दिवस आहे. आजही अनेक भारतीय विविध खेळांमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर नशीब आजमवतील.

Tokyo Olympic 2020 Live : भारतीय महिला हॉकी संघ पुन्हा पराभूत, जर्मनीचा 2-0 ने विजय
भारतीय महिला हॉकी संघ

टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचा (Tokyo olympic 2020) आज चौथा दिवस आहे. भारतानं स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशीच वेटलिफ्टींगमध्ये रौप्यपदक जिंकत पदकाचं खातं उघडलं. पण त्यानंतर तिसरा दिवस भारतासाठी जास्त खास ठरला नाही. पीव्ही सिंधू आणि मेरी कोम सोडता बहुतांश खेळाडूंना पराभवच स्वीकारावा लागला. चौथा दिवसही भारतासाठी निराशाजनक ठरला भारताला आज काहीच खास कामगिरी करता आली नाही.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Jul 2021 07:20 PM (IST)

    भारतीय महिला पराभूत

    पहिल्या सामन्यात नेदरलँडकडून पराभवानंतर भारतीय महिला हॉकी संघ दुसऱ्या सामन्यातही जर्मनीकडून पराभूत झाला आहे. 2-0 च्या फरकाने भारतीय महिला पराभूत झाल्या.

  • 26 Jul 2021 06:49 PM (IST)

    महिला हॉकी : जर्मनी 2-0 ने पुढे

    जर्मनीने सामन्यात आणखी एक गोल करत 2-0 ची आघाडी घेतली. जर्मनीत्या एन श्रोडरने हा गोल केला असून त्यानंतर काही वेळातच भारतालाही पेनल्टी कॉर्नर मिळाली ती जी भारताने गमावली.

  • 26 Jul 2021 06:11 PM (IST)

    महिला हॉकी- जर्मनीचा पहिला गोल

    पहिल्या क्वॉर्टरमधील खेळ समाप्त होताना जर्मनीचा संघ 1-0 ने पुढे आहे. सुरुवातीपासूनच जर्मनीचा संघ आक्रमक खेळ करत आहे. 12 व्या मिनिटांला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीने आघाडी घेतली.

  • 26 Jul 2021 05:52 PM (IST)

    महिला हॉकी- भारत वि. जर्मनी सामन्याला सुरुवात

    भारत आणि जर्मनीच्या महिला हॉकी संघात सामना सुरु झाला आहे. पहिल्या सामन्यात पराभवानंतर भारतीय महिला आज विजयासाठी जीवाचं रान करतील हे नक्की. क्वॉर्टर फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी भारतीय महिलांना आजचा विजय महत्त्वाचा आहे.

  • 26 Jul 2021 04:19 PM (IST)

    पोहणे – सेमीफायनलमध्ये पोहोचण्यात साजन प्रकाश अयशस्वी

    भारताचा ऑलिम्पकमध्ये सहभागी होणारा पहिला जलतरणपटू साजन प्रकाश स्पर्धेत खास कामगिरी करु शकला नाही. 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धेच्या हीट-2 मध्ये 1.57.22 सेंकेदाचा वेळ घेत साजन चौथ्या स्थानावर राहिला. ज्यामुळे सेमीयनलमध्ये प्रवेश मिळवण्यात साजन अयशस्वी ठरला.

  • 26 Jul 2021 04:00 PM (IST)

    टेनिस : नोव्हाकचा शानदार विजय

    जगातील नंबर-1 चा पुरुष टेनिस खेळाडू असणाऱ्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हीचने पुरुष एकेरीत दुसऱ्या राउंडमध्ये विजय मिळवला आहे. त्याने जर्मनीच्या ज्यां लेनार्ड स्ट्रफला 6-4 आणि 6-3 च्या फरकाने मात दिली.

  • 26 Jul 2021 03:38 PM (IST)

    बॉक्सींग – आशीष कुमार पराभूत

    भारताचा बॉक्सर आशीष कुमार टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. 75 किलोग्राम वर्गात चीनी बॉक्सर एर्बीकेने आशीषला 5-0 च्या फरकाने मात दिली. या पराभवासोबतच आशीषची यंदाच्या ऑलिम्पिकमधील यात्राही संपली आहे.

  • 26 Jul 2021 03:34 PM (IST)

    आज दिवसाभरातील भारताच्या उर्वरीत स्पर्धा

    पोहणे – साजन प्रकाश (पुरुष 200 मीटर बटरफ्लाई-हीट 2) (दुपारी 3: 50 मिनिटांनी)

    महिला हॉकी – भारत विरुद्ध जर्मनी – (सायंकाळी 5:45 मिनिटांनी)

  • 26 Jul 2021 01:47 PM (IST)

    टेबल टेनिस – महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात

    भारताची आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्राची टोक्यो ओलिम्पिकमधील यात्रा संपली आहे. पहिल्या दोन फेरीत विजायनंतर तिसऱ्या फेरीत पोहचणारी ती महिली भारतीय महिला बनली होती. पण तिसऱ्या राउंडमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सोफिया पोलकोनोवाने मनिकाला 11-8,11-2,11-5, 11-7 च्या फरकाने नमवत स्पर्धेबाहेर केलं. मनिका आधी आज सकाळी सुतीर्था मुखर्जी दुसरे फेरीत पराभूत झाली होती.

  • 26 Jul 2021 01:21 PM (IST)

    टोक्यो ओलिम्पिक कोरोना अपडेट

    टोक्यो ओलिंम्पिकमध्ये कोरोनाच्या केसेसची संख्या 148 झाली आहे. आयोजकांनी सोमवारी 16 नवीन कोरोनाबाधितांची माहिती दिली. ज्यामध्ये तीन खेळाडूंचाही समावेश आहे.

  • 26 Jul 2021 12:42 PM (IST)

    पिकविम्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील स्वाभिमानी शेतकऱ्यांची पुण्यात धडक

    पिकविम्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील स्वाभिमानी शेतकऱ्यांची पुण्यात धडक.

    प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे,विदर्भ अध्यक्ष प्रशांत दिक्कर व मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली कृषी आयुक्त कार्यालय येथे बेमुदत आंदोलनाला सुरवात.

    खरीप पीकविमा दया व पिकविम्याचा बीड पॅटर्न रद्द करा व पीकविमा नाकारणाऱ्या कंपण्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

    पीकविमा न दिल्यास कृषी आयुक्ताला घेराव घालण्याचा प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या इशारा

  • 26 Jul 2021 12:33 PM (IST)

    टेनिसमधील भारताची स्पर्धा समाप्त

    टेनिसपटू सुमित नागलच्या पराभवासोबतच टोक्यो ओलिम्पिकमधील भारताची टेनिस खेळातील स्पर्धा संपुष्टात आली आहे. भारताने यावेळी केवळ पुरुष एकेरी आणि महिला दुहेरी स्पर्धेतच सहभाग घेतला होता.  आधी सानिया मिर्झा आणि अंकिता रैना जोडी पराभूत झाल्यानंतर आता सुमित नागलही पराभूत झाल्यामुळे भारताच्या टेनिस स्पर्धेत पदक मिळवण्याच्या आशा मावळल्या आहेत.

  • 26 Jul 2021 12:07 PM (IST)

    आजच्या दिवसातील भारतीय खेळाडूुंचे उर्वरीत सामने

    टेबल टेनिस – मनिका बत्रा, महिला एकेरीचा तिसऱ्या फेरीतील सामना (दुपारी 01:00 वाजता)

    बॉक्सिंग – आशीष कुमार, पुरुष गटातील राउंड ऑफ 32 मधील सामना (दुपारी 03:06 वाजता)

    महिला हॉकी – भारत विरुद्ध जर्मनी  (सायंकाळी 05:45 वाजता)

  • 26 Jul 2021 11:53 AM (IST)

    टेनिस – नाओमी ओसाका तिसऱ्या फेरीत दाखल

    जगातील आघाडीची टेनिसपटू आणि जपानची नाओमी ओसाका दुसऱ्या राउंडमधील मुकाबल्यात विजयी झाली आहे. तिने  स्वित्झर्लंडच्या विक्टोरिया गोलूबिकला 6-3,6-2 च्या फरकाने मात देत महिला एकेरीत पुढील फेरी गाठली.

  • 26 Jul 2021 10:59 AM (IST)

    बॅडमिंटन – भारतीय जोडीकडे अजूनही संधी बाकी

    इंडोनेशियाकडून पराभवानंतर भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विक आणि चिरागची ऑलिम्पिक यात्रा संपलेली नाही. त्यांनी पुढील सामन्यात ब्रिटेनच्या बेन लेन आणि शॉन वेंडी यांना मात दिल्यास ते पुढील फेरीत प्रवेश करु शकतात.

  • 26 Jul 2021 10:57 AM (IST)

    बॅडमिंटन – सात्विक-चिरागची जोडीही विजय मिळवण्यात अयशस्वी

    पुरुष बॅडमिंटन दुहेरीच्या दुसऱ्या गेममध्ये इंडोनेशियाने भारताला एकही संधी दिली नाही. त्यामुळे भारत दुसऱ्या गेममध्येही 12-21 च्या फरकाने पराभूक झाला. ज्यामुळे सामनाही इंडोनेशियाने 21-13,21-12 च्या फरकाने आपल्या नावे केला.

  • 26 Jul 2021 10:54 AM (IST)

    आर्चरी – कोरियाकडून क्वॉर्टरफायनलमध्ये भारतीय पुरुष संघ पराभूत

    आर्चरी स्पर्धेत भारती संघाने 9-9-8 (तरुणदीप-8) अशा फरकाने सुरुवाक केली होती. तर कोरियाने पहिल्या राउंडमध्ये 8-10-10 असा स्कोर मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या राउंडमध्ये भारतापेक्षा सरस कामगिरी करत कोरियाने सामना 6-0 ने जिंकला.

  • 26 Jul 2021 10:32 AM (IST)

    बॅडमिंटन – चिराग शेट्टी आणि सात्विक जोडीचा सामना सुरु

    पुरुष दुहेरीच्या क्वॉर्टरफायनलमध्ये भारताची सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी ही जोडी इंडोनेशियाच्या जगातील अव्वल क्रमाकांच्या जोडीशी सामना खेळत आहे. पहिल्या गेममध्ये भारत 9-13 च्या फरकाने पिछाडीवर आहे.

  • 26 Jul 2021 10:29 AM (IST)

    स्केटबोर्डिंग – 13 वर्षीय निशियाची कमाल, जिंकल सुवर्णपदक

  • 26 Jul 2021 10:23 AM (IST)

    बॅडमिंटन – बी साईप्रणीतची ऑलिम्पिक यात्रा समाप्त

    दुसरा सामना न खेळताच बी साईप्रणीतचं ऑलिम्पिकमधून बाहेर झालं निश्चित आहे. प्रणीतला मात देणाऱ्या इस्त्राईलच्या मिशा जिल्बरमॅनने दुसरा सामना जिंकला आहे. त्यामुळे प्रणीत असणाऱ्या गटामध्ये टॉप 2 मध्ये जाण्याच्या प्रणीतच्या आशा संपल्या आहेत. त्यामुळे दुसऱा सामना जिंकूनही प्रणीतचे ऑलिम्पिकमधून बाहेर जाणे निश्चित झाले आहे.

  • 26 Jul 2021 10:20 AM (IST)

    फेन्सिग – दुसऱ्या फेरीत भवानी देवी पराभूत

    पहिल्यांदाच ऑनिम्पिकमध्ये खेळणारी भारताची तलवारबाज भवानी देवी पहिल्या फेरीतील विजयानंतर दुसऱ्या फेरीत मात्र पराभूत झाली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाला असणाऱ्या फ्रान्सच्या मॅनन ब्रुनेटला चुरशीची टक्कर दिल्यानंतरही भवामी 7-15 च्या फरकाने पराभूत झाली.

Published On - Jul 26,2021 10:17 AM

Follow us
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.