Tokyo Olympic 2020 Live : ऑस्ट्रलियाचा भारतीय पुरुष हॉकी संघावर दमदार विजय, 7-1 च्या फरकाने सामन्यात विजय

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचा (Tokyo olympic 2020) आज तिसरा दिवस आहे. रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम, पीव्ही सिंधू आणि जी साथियानसारखे स्टार खेळाडू मैदानात एन्ट्री करतील.

Tokyo Olympic 2020 Live : ऑस्ट्रलियाचा भारतीय पुरुष हॉकी संघावर दमदार विजय, 7-1 च्या फरकाने सामन्यात विजय
भारतीय हॉकी संघ

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचा (Tokyo olympic 2020) आज तिसरा दिवस आहे. भारतानं दुसर्‍या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या रौप्यपदकासह आपल्या पदकाचं खातं उघडलं. आजही भारत अनेक खेळात भाग घेईल. दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही स्टार खेळाडू मनु भाकर (manu Bhakar) आणि यशस्विनी देसवाल (Yashswini Deswal) 10 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नाहीत.

रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम, पीव्ही सिंधू आणि जी साथियानसारखे स्टार खेळाडू मैदानात एन्ट्री करतील. भारतीय खेळाडू बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंग, नेमबाजी, टेबल टेनिस, टेनिस आणि स्विमिंग यामधील आपलं कौशल्य दाखवतील आणि प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान उभं करतील. याशिवाय, सेलिंग, नौकाविहार, कलात्मक जिम्नॅस्टिक आणि स्विमिंगमध्येही भारत आपला दम दाखवणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 25 Jul 2021 16:45 PM (IST)

  ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारुण पराभव

  भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ओलिम्पिक 2020 मध्ये पहिल्या सामन्यता न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ दाखवत भारतावर 7-1 च्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताकडू दिलप्रीत सिंगने एकमेव गोल केला.

 • 25 Jul 2021 16:07 PM (IST)

  भारताने खोललं खातं

  सामन्यात अखेर भारताने आपलं खातं खोललं आहे. पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताने सामन्याची 4-1 ची अशी गुणसंख्या केली आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दिलप्रीत सिंगने गोल केला आहे. 

 • 25 Jul 2021 15:43 PM (IST)

  ऑस्ट्रेलियाकडून आक्रमक खेळी

  भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघातील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत तब्बल 4 गोल्सची आघाडी घेतली आहे. तर भारताला अजून खातेही खोलता आलेले नाही.

 • 25 Jul 2021 15:39 PM (IST)

  बॉक्सिंग : बॉक्सर मनीष कौशिक पहिल्याच सामन्यात पराभूत

  मेरी कोमने दिवसातील पहिला बॉक्सिंग सामना जिंकल्यानंतर पुरुष बॉक्सर मनीष कौशिक ही रिंगमध्ये उतरला. मात्र त्याला मेरीप्रमाणे विजय मिळवता आला नाही आणि 63 किलोग्राम वजन गटात राउंड 32 मध्येच त्याचा पराभव झाला. मनीषला ब्रिटनच्या ल्यूक मॅकोरमॅक याने 4-1 च्या फरकाने पराभूत केलं. शनिवारी बॉक्सर विकास कृष्ण पराभूत झाल्यानंतर आता मनीषलाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 • 25 Jul 2021 15:15 PM (IST)

  असा आहे भारतीय संघ

 • 25 Jul 2021 15:14 PM (IST)

  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघात सामना सुरु आहे. भारताने पहिला सामना न्यूझीलंड विरुधात जिंकल्यानंतर आज दुसरा सामना खेळत आहे.

 • 25 Jul 2021 13:56 PM (IST)

  बॉक्सिंग – मेरीकॉम राउंड ऑफ 32 मध्ये विजयी

  मेरीकॉमने राउंड ऑफ 32 मध्ये विजय मिळवत टोक्यो ऑलिम्पक स्पर्धेचा श्रीगणेशा केला आहे. तिने सामना 4:1 च्या फरकाने जिंकला. सामन्याच उत्कृष्ठ असा बचावात्मक खेळ दाखवत मेरीने विजय मिळवला. या शानदार विजयामुळे मेरीकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

 • 25 Jul 2021 13:37 PM (IST)

  टेबल टेनिस – मनिका बत्रा विजयी, तिसऱ्या फेरीत प्रवेश

  टेबल टेनिस स्टार मनिका बत्राने महिला एकेरीमध्ये दुसऱ्या फेरीत विजय मिळवत तिसरी पेरी गाठली आहे. मनिकाने  शानदार खेळ दाखवत सामना जिंकला. आधी 2-0 ने पिछाडीवर असणाऱ्या मनिकाने पुनरागमन करत 4-3 ने सामना जिंकला. मनिकाने यूक्रेनच्या पेस्तोस्का हिला 4-11,4-11,11-7,12-10,8-11,11-5,11-7 च्या फरकाने मात दिली.

 • 25 Jul 2021 13:08 PM (IST)

  टेबल टेनिस – मनिका बत्रा 2-2 च्या गुणसंख्येने बरोबरीत

  भारताची आघाडीची टेबल टेनिस स्टार मनिका बत्राने दुसराही गेम 12-10 च्या फरकाने जिंकत सामन्यात 2-2 से बरोबरी साधली आहे.  

 • 25 Jul 2021 12:13 PM (IST)

  जिमनास्टिक्स – प्रणती नायकची ऑलिम्पिक यात्रा समाप्त

  भारताची आर्टिस्टिक जिमनास्ट प्रणती नायक ऑल राउंड फाइनल्ससाठी पात्रता फेरी पार करु शकली नाही. चारही कॅटेगरीमध्ये मिळून तिचा स्कोर 42.565 इतकाच होता. ती दुसरे सबडिविजनमध्ये 29 व्या रँकवर होती. दरम्यान टॉप 24 खेळाडूच ऑलराउंड फायनलमध्ये जात असल्याने प्रणती स्पर्धेबाहरे गेली आहे.

 • 25 Jul 2021 11:49 AM (IST)

  टेबल टेनिस – जी साथियान पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभूत

  भारताचा टेबल टेनिसपटू जी साथियान पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला आहे. त्याला हाँगकाँगच्या लॅम सियू हँगने रोमहरर्षक सामन्यात 4-3 च्या फरकाने मात दिली. साथियान सामन्यात 3-1 ने पुढे असताना शेवटच्या तिन्ही राउंडमध्ये पराभूत झाला. हँगने 11-7,7-11, 4-1, 5-11, 11-9, 11-10, 11-6 च्या फरकाने सामना जिंकला.

 • 25 Jul 2021 10:52 AM (IST)

  शूटींग – चार सीरीजनंतर दिव्यांश आणि दीपक टॉप 30 मध्ये

  चार सीरीजनंतर भारतीय निशानेबाज दीपक कुमार आणि दिव्यांश हे टॉप 30 मध्ये पोहोचले आहेत. पण फायनल राउंड असून दूर आहे. 

  दिव्यांश  -102.9, 103.7, 103.6, 104.6

  दीपक कुमार – 102.9, 103.8, 103.7,105.2

 • 25 Jul 2021 10:50 AM (IST)

  स्केटबोर्डिंग – जपानच्या यूटो होरीगोमने रचला इतिहास, जिंकला पहिलं सुवर्णपदक

 • 25 Jul 2021 10:32 AM (IST)

  शूटींग – दिव्यांश आणि दीपकचे सुमार प्रदर्शन

  सध्या भारत शूटींग स्पर्धेमध्ये खेळत असून दीपक आणि दिव्यांश हे भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी दोघांनी सुमार प्रदर्शन दाखवले आहे. दोन सीरीजनंतर दीपक 34 आणि दिव्यांश 36 व्या क्रमांकावर आहे. दीपकची सरासरी 10.3 तर दिव्यांशची 10.2 आहे.

 • 25 Jul 2021 10:10 AM (IST)

  टेनिस- वर्ल्ड नंबर वन एश्ले बार्टी बाहेर

 • 25 Jul 2021 10:04 AM (IST)

  टेनिस- सानिया अंकिताची जोडी पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर

  सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाची जोडी पहिल्या फेरीत आधीच बाहेर पडली आहे. त्यांनी युक्रेनियन जोडीविरुद्ध पहिला सेट 6-0 ने जिंकला. यानंतर युक्रेनियन जोडीने पुढील दोन सेट 7-6,8-10 जिंकून सामना जिंकला.

 • 25 Jul 2021 09:19 AM (IST)

  टेनिस – सिंगल्स इव्हेंटमध्ये एंडी मरे सहभागी होणार नाही

 • 25 Jul 2021 08:44 AM (IST)

  ऑस्ट्रेलियाचा जलतरण रिले संघाचा विश्वविक्रम

  ऑस्ट्रेलियाच्या महिला रिले संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 4 × 100 मीटर फ्रीस्टाईल (जलतरण) मध्ये देशाचे पहिलं सुवर्णपदक जागतिक विक्रमासह जिंकलं.

 • 25 Jul 2021 08:42 AM (IST)

  टेनिस- सानिया-अंकिताने पहिला सेट जिंकला

  सानिया मिर्झा आणि अंकिता रैनाने 21 मिनिटांत पहिला सेट 6-0 ने सहज जिंकला. सानिया-अंकिता जोडी सामन्यात 1-0 ने आघाडीवर आहेत. तत्पूर्वी, सुमित नागलने शुक्रवारी आपल्या पहिल्या सामन्यात विजयासह सुरुवात केली आहे.

 • 25 Jul 2021 07:54 AM (IST)

  बॅडमिंटन : PV सिंधूने पहिली मॅच जिंकली, ग्रुप राऊंडचा पुढचा सामना मंगळवारी खेळणार

 • 25 Jul 2021 07:49 AM (IST)

  बॅडमिंटन- पीव्ही सिंधूने सहजरित्या पहिली मॅच जिंकली

  पीव्ही सिंधूने पहिला सामना एकतर्फी जिंकला. अवघ्या 28 मिनिटांत तिने इस्राईलच्या सेनियाचा 21-7, 21-10 असा पराभव करून सहज विजय मिळविला. आता ती मंगळवारी ग्रुप राऊंडचा पुढील सामना खेळेल.

 • 25 Jul 2021 07:46 AM (IST)

  बॅडमिंटन- पीव्ही सिंधूने 21-7 ने जिंकला पहिला सेट

  पीव्ही सिंधूने पहिला गेम अवघ्या 13 मिनिटांत 21-7 ने जिंकला. इस्त्राईलची सेनिया जखमी झाली, त्याचा फायदा सिंधूला झाला आहे. सिंधू तिला पूर्ण कोर्टात फिरवत आहे.

 • 25 Jul 2021 07:44 AM (IST)

  बॅडमिंटन- पीव्ही सिंधू अॅक्शनमध्ये

  पीव्ही सिंधूचा सामना गट J च्या तिच्या पहिल्या सामन्यात इस्त्रायली खेळाडूशी होत आहे. सिंधू या वेळी पदकाची मोठी आशा मानली जात आहे. ती विजयासह आपली मोहीम सुरु करण्यास इच्छुक आहे.

 • 25 Jul 2021 07:43 AM (IST)

  हिना सिद्धूकडून मनुच्या हिमतीची तारीफ

 • 25 Jul 2021 07:41 AM (IST)

  स्कीट- अंगद बाजवा आणि मेराज खानची चांगली सुरुवात

  पुरुष स्कीटच्या पात्रता फेरीत मेराज खान आणि अंगद बाजवा यांनी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीत मेराजने परिपूर्ण 25 गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे तर अंगद पाचव्या स्थानावर आहे. या स्पर्धेतील पहिले सहा खेळाडू अंतिम फेरीत जातील.

 • 25 Jul 2021 07:40 AM (IST)

  भारतासाठी दिवसाची चांगली बातमी, रोइंग- अरविंदसिंग आणि अरुण लाल सेमीफायनलमध्ये

  भारतासाठी दिवसाची पहिली चांगली बातमी. अरविंदसिंग आणि अरुण लाल यांनी लाइटवेट मेन्स डबल्स स्कलच्या रेपेचेज फेरीत 6:51:36 वेळेसह तिसरे स्थान पटकावले आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

 • 25 Jul 2021 07:38 AM (IST)

  तिसऱ्या दिवसाची खराब सुरुवात, मनु भाकर आणि यशस्विनी देसवालकडून निराशा

  तिसर्‍या दिवसाची खराब सुरुवात झाली आहे. भारताच्या स्टार मानू भाकर आणि यशस्विनी देसवाल यांना 10 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. दोघीही चांगल्या लयमध्ये होत्या पण त्यांना संधीचा फायदा घेता आला नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI