Tokyo Olympics 2020 Live: भारतीय हॉकी संघाचा दमदार विजय, जपान संघावर 5-3 ने मात

| Updated on: Jul 30, 2021 | 7:19 PM

Tokyo olympic 2020 Live : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा आठवा दिवस आहे. गुरुवारी देशाला अनेक खेळांमध्ये यश मिळाले पण मेरी कोमच्या पराभवाने चाहत्यांना मोठा धक्का दिला.

Tokyo Olympics 2020 Live: भारतीय हॉकी संघाचा दमदार विजय, जपान संघावर 5-3 ने मात
भारतीय हॉकी संघ

Tokyo Olympic 2020 Live : टोकियो ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी भारतासाठी हॉकी, तिरंदाजी आणि बॅडमिंटनमधून चांगली बातमी मिळाली, तर बॉक्सिंगमध्ये भारताच्या वाट्याला निराशा आली. देशाची स्टार बॉक्सर मेरी कोमला राऊंड ऑफ 32 मध्ये पराभव पत्करावा लागला. पीव्ही सिंधू, अतानू दास आणि सतीश कुमार यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. 30 जुलै म्हणजेच आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारताचे काही खेळाडू पदकापासून एख पाऊल दूर असतील. पीव्ही सिंधू आणि दीपिका कुमारी सारख्या स्टार खेळाडूंवर देशवासियांच्या नजरा असतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Jul 2021 04:39 PM (IST)

    भारतीय संघ 5-3 ने विजयी

    भारत आणि जपान हॉकी संघात झालेल्या सामन्यात दोन्ही संघानी चुरशीची लढत दिली. भारताने 5 गोल्सची आघाडी घेतल्याने अखेरच्या काही मिनिटात जपानने गोल करतही भारत विजयी झाला.

    Men’s #Hockey: #TeamIndia beat Japan by 5-3#Tokyo2020 | #Cheer4India | #TokyoOlympics pic.twitter.com/FypebHv8yO

    — AIR Sports #TokyoOlympics (@akashvanisports) July 30, 2021

  • 30 Jul 2021 03:57 PM (IST)

    हॉकी : भारत विरुद्ध जपान पुरुष संघाचा सामना सुरु

    भारत आणि जपान यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात हाल्फ टाईमपर्यंत बारतीय संघाने 2-1 ची आघाडी घेतली आहे.

  • 30 Jul 2021 02:59 PM (IST)

    बॅडमिंटन : पीव्ही सिंधूचा धमाकेदार विजय, सेमीफायनलमध्ये मिळवली जागा

    पीव्ही सिंधूने रोमहर्षक सामन्यात जपानच्या यामागुचीला नमवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. पहिला सेट 21-13 ने जिंकल्यानंतर दुसरा सेट अटीतटीचा झाला. दुसऱ्या सेटमध्ये 22-20 ने सिंधूने विजय मिळवत सामना जिंकला.

  • 30 Jul 2021 02:29 PM (IST)

    बॅडमिंटन - पहिला सेट सिंधू विजयी

    यामागुचीने सिंधूला चुरशीची टक्कर दिली. मात्र सिंधूने अप्रतिम बॅडमिंटन शॉट खेळत पहिला सेट चांगल्या फरकाने जिंकला. पहिल्या सेटमध्ये यामागुचीचा स्कोर 13 तर सिंधूचा 19 होता.

  • 30 Jul 2021 02:27 PM (IST)

    बॅडमिंटन - पीव्ही सिंधूच्या सामन्याला अखेर सुरुवात

    भारताची पीव्ही सिंधू आणि जपानच्या अकाने यामागुची यांच्यातील लढत अखेर सुरु झाली आहे. सामना सुरु होण्यासाठी 35 मिनिटं उशीर झाला आहे.

  • 30 Jul 2021 01:29 PM (IST)

    बॅडमिंटन - पीव्ही सिंधू थोड्याच वेळात मैदानात

    रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या पीव्ही सिंधूचा यंदाच्या ऑलिम्पिकमधील पुढील सामना काही वेळातच सुरु होणार आहे. यंदा सिंधू भारताला पदक मिळवून देण्याची आशा प्रबळ आहे. सिंधू जपानच्या अकाने यमागुचीसोहत उपांत्य पूर्व फेरीचा सामना खेळणार आहे.

  • 30 Jul 2021 11:46 AM (IST)

    तिरंदाज – दीपिका कुमारी उपांत्य पूर्व फेरीत पराभूत

    तिसऱ्या सेटमध्ये एन सानच्या विजयाने दीपिका कुमारीचा पराभूव निश्चित झाला असून सोबतच भारताच्या पदकाच्या आशाही मावळल्या आहेत. एन सानने पहिला सेटमध्ये काहीशी पिछाडीवर असतानाही दीपिकाही खास कामगिरी करु न शकल्याने अखेर पराभूत झाली.

    तिसरा सेट

    एन सान – 8-9-9 (26 गुण) दीपिका – 7-8-9 (24 गुण)

    दूसरा सेट

    एन सान – 9-10-7 (26 गुण) दीपिका – 9-7-7 (24 गुण)

    पहिला सेट

    एन सान – 10-10-10 (30 गुण) दीपिका – 7-10-10 (27 गुण)

  • 30 Jul 2021 11:04 AM (IST)

    भारतीय महिलांचा रोमहर्षक विजय

    भारतीय महिलांनी आयर्लंड संघाविरुद्धचा सामना अखेर जिंकला आहे. भारतीय कर्णधार रानी रामपालच्या मदतीने नवनीत कौरने गोल करत सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत गोल करत सामना 1-0 ने जिंकला.

  • 30 Jul 2021 09:28 AM (IST)

    बॉक्सर लवलीना बोरगोहेनचं मेडल पक्कं!

  • 30 Jul 2021 07:42 AM (IST)

    सलग दुसरं ऑलिम्पिक, नेमबाजीत भारताला रिकाम्या हाताने परतावं लागलं!

    25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेची पात्रता फेरी संपताच मनु भाकरचा ऑलिम्पिक प्रवासही पूर्ण झाला. मनुने तीन स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि तिला कोणत्याही प्रकारात अंतिम फेरी गाठता आली नाही. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पिस्टल नेमबाजीत भारताला रिकाम्या हाताने परतावं लागलं.

  • 30 Jul 2021 07:35 AM (IST)

    मनु भाकर, राही सरनोबतकडून निराशा

  • 30 Jul 2021 06:54 AM (IST)

    अॅथलॅटिक्स : अविनाश साबळे सातव्या स्थानावर

    अविनाश साबळे 3000 च्या स्टीपलचेस रेसमध्ये सातव्या स्थानावर आहे. त्याने 08: 20.20 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रत्येक हीटमधील पहिले तीन पुढच्या फेरीत प्रवेश करतील. याखेरीज उर्वरित खेळाडूंमधील अव्वल सहा वेळेचे खेळाडूही पुढील फेरीसाठी पात्र ठरतील.

  • 30 Jul 2021 06:52 AM (IST)

    दीपिकाने 6-5 असा सामना जिंकला, क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश

    शूटिंगमध्ये दीपिकाने हा रोमांचक सामना 6-5 ने जिंकला. ROC च्या पारोव्हाने 07 गुण मिळवताना दीपिकाने परिपूर्ण 10 लावत सामना जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Published On - Jul 30,2021 6:40 AM

Follow us
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट.
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.