Tokyo Olympics Day 11 भारतासाठी निराशाजनक, हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव, एथलेटिक्स खेळातही अपयश

Tokyo Olympic day 11 is Hopeless for team india lost mens hockey semifinal and several events

Tokyo Olympics Day 11 भारतासाठी निराशाजनक, हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव, एथलेटिक्स खेळातही अपयश
टोकियो ऑलम्पिक

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिक्समध्ये (Tokyo Olympics 2020) आजचा (3 ऑगस्ट) 11 वा दिवस भारतासाठी अत्यंत निराशाजनक ठरला. कोणत्याच स्पर्धेत यश न मिळवता आलेल्या भारतीय संघाला उलट सुवर्णपदकाची सर्वाधिक आशा असणाऱ्या पुरुष हॉकी स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. हॉकी, एथलेटिक्ससह कुस्तीच्या मैदानातही भारतीयांनी आज नशीब आजमवलं पण सर्वत्र पदरी निराशाच पडली.

आतापर्यंत भारताला दोन पदकं मिळाली असून तिसरं पदक निश्चित झालं आहे. यामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य पदक मिळवलं आहे. तर दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने महिला एकेरीत कांस्य पदक मिळवलं आहे. याशिवाय बॉक्सिंगमध्ये  महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने सेमीफायनलमध्ये एंट्री मिळवत किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे. पण 11 व्या दिवशी भारताला काहीच खास कामगिरी करता आली नाही.

महिला भाला फेक- अन्नु रानी पात्रता फेरीतच बाहेर

भारतला दिवसाच्या सुरुवातीच्या स्पर्धेतच निराशा मिळाली. महिलांच्या भाला फेक स्पर्धेच्या क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये  नॅशनल रेकॉर्ड होल्डर अन्नु रानी सहभागी झाली होती.  ऑलिम्पिक पदार्पण करणारी रानी फायनलसाठी क्वॉलिफिकेशन करण्यात अयशस्वी ठरली. तीन प्रयत्नातील 54.04 मीटर हा तिचा बेस्ट थ्रो ठरला. ज्यामुळे 15 खेळाडूंमध्ये ती 14 वी आली. ज्यामुळे पुढील फेरीत जाण्यापासून हुकली.

पुरुष हॉकी सेमीफायनल

भारतासाठी दिवसातील सर्वात महत्त्वाचा सामना असणाऱ्या पुरुष हॉकी संघाच्या सामन्यात भारताला बेल्जियमकडून 5-2 ने पराभव स्विकारावा लागला. तब्बल49 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या भारताच्या पदरी निराशा पडली. सामन्यात 49 व्या मिनिटापर्यंत भारत 2-2 च्या बरोबरीत होता. पण अखेरच्या 11 मिनिटात बेल्जियमने 3 गोल ठोकत भारताला पराभूत केल. आता भारतीय संघाकडे किमान कांस्य पदक मिळवण्याची संधी असून यासाठी 5 ऑगस्टच्या सामन्यात जर्मनीला पराभूत करणे गरजेचे आहे.

कुस्ती- पहिल्या फेरीतच सोनम पराभूत

फ्रीस्टाइल कुस्तीमघ्ये भारताची 19 वर्षीय कुस्तीपटू सोनमने मलिक 62 किलोग्राम वजनी गटात सहभाग घेतला होता. तिचा पहिलाच सामना मंगोलियाच्या बोलोरतुया हिच्याशी झाला ज्यात सोनमने बराच वेळ 2-0 ची आघाडी ठेवली होती.पण नंतर प्रतिस्पर्धी खेळाडूने देखील बढत घेत 2-2 ची बरोबरी साधली. सोनमकडे रेपेचेजच्या मदतीने पुढे जाण्याची संधी होती. पण मंगोलियाची कुस्तीपटू फायनलमध्ये न पोहोचल्याने दोघींनाही स्पर्धेच्या नियामांनुसार बाहेर करण्यात आलं.

गोळाफेकः तजिंदर तूर पात्रता फेरीत पराभूत

भारताची दिवसातील शेवटची स्पर्धा असणाऱ्या गोला फेकमध्ये भारताचा तजिंदरपाल सिंग तूर पात्रता फेरीत जागा मिळवू शकला नाही. स्पर्धेत त्याचा सर्वश्रेष्ठ थ्रो 19.99 मीटर इतकाच होता.  क्वालिफिकेशनसाठी 21.20 मीटर लांबी किंवा अव्वल 12 मध्ये येणं आवश्यक होतं. सिंग 13 व्या स्थानावर राहिल्याने त्याचं पुढील फेरीत जाणं थोडक्यात राहिलं.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: भारतीय हॉकी संघाला कांस्य पदकाची आशा, असे असेल आव्हान

Tokyo Olympic 2021: हॉकी संघाच्या सेमीफायनलमध्ये पराभवानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले…

Tokyo Olympics 2021: भारताचं पदक हुकलं, डिस्कस थ्रोच्या फायनलमध्ये कमलप्रीत पराभूत

(Tokyo Olympic day 11 is Hopeless for team india lost mens hockey semifinal and several events)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI