AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा खेळांचा कुंभमेळा होता, चौथ्या स्थानावर राहून खूश कसं राहू?’, पदकाने हुलकावणी दिल्याने आदिती भावूक

"मी गोल्फ खेळायला सुरुवात केली होती, त्यावेळी मला कधीच वाटलं नव्हतं, की मी कधी ऑलिम्पिक खेळेन... त्यावेळी गोल्फ ऑलिम्पिकमध्ये खेळलं जात नव्हतं... मेहनत आणि खेळाचा पूर्ण आनंद घेऊन मी इथपर्यंत पोहोचल्याचं" आदितीने सांगितलं.

'हा खेळांचा कुंभमेळा होता, चौथ्या स्थानावर राहून खूश कसं राहू?', पदकाने हुलकावणी दिल्याने आदिती भावूक
आदिती अशोक
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 6:33 AM

Tokyo Olympic  2020 :  टोकियो ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी गोल्फमध्ये भारताचं रौप्य पदक थोडक्यात हुकलं. भारताच्या अदिती अशोकला (Aditi Ashok) चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताची युवा गोल्फर आदिती अशोकला ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यात अपयश आलंय. याचमुळे ती दु:खी आहे… “ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा कुंभमेळा…. या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहून मी खूश कसं राहू”, अशा दु:खद भावना आदिती अशोकने व्यक्त केल्या.

पण आता कशी खूश राहू…?

शुक्रवारी रात्री दुसऱ्या स्थानावर असलेली आदितीची शनिवारी चौथ्या राऊंडमध्ये घसरण झाली. 269 गुणांसह ती चौथ्या स्थानावर राहिली. दुसरी कोणती स्पर्धा असती तर मी खूश राहिली असते पण आता कशी खूश राहू…? ऑलिम्पिकमध्ये मी चौथ्या स्थानावर राहिले याचं वाईट वाटतंय, असं आदिती अशोक म्हणाली.

पदक जिंकू शकले नाही, याचं मनोमन दु:ख वाटतंय

पदक जिंकू शकले नाही, याचं मनोमन दु:ख वाटतंय… त्यात मी चौथ्या स्थानावर राहिली, याचीही बोच आहे… शेवटच्या राऊंडमध्ये मी आणखी चांगलं प्रदर्शन करु शकले असतं, किंबहुना करायला हवं होतं.., असं आदिती म्हणाली.

सर्वसामान्य लोकांपर्यंत गोल्फ पोहोचलंय, याचा आनंद वाटतोय…

“मला वाटतं की आता भारताने गोल्फला समजून घेतलंय… ऑलिम्पिकमध्ये गोल्फ सुरु असताना लोकांनी खूप प्रेम दिलं… चांगला पाठिंबा दिला… आतापर्यंत सधन लोकांचा खेळ म्हणून गोल्फकडे पाहिलं जाचयं… पण आता सर्वसामान्य लोकांपर्यंत गोल्फ पोहोचलंय, याचा आनंद वाटतोय…”

“जर मी पदक जिंकलं असतं तर सगळ्यांना खूप आनंद झाला असता. आताही सगळेच खूश आहेत… पण पदकाचा आनंद काही वेगळा असतो… मी या सगळ्याचा विचार मॅचच्या दरम्यान केला नव्हता”, असंही आदिती म्हणाली.

मला कधी वाटलं नव्हतं मी ऑलिम्पिक खेळेन…

“मी गोल्फ खेळायला सुरुवात केली होती, त्यावेळी मला कधीच वाटलं नव्हतं, की मी कधी ऑलिम्पिक खेळेन… त्यावेळी गोल्फ ऑलिम्पिकमध्ये खेळलं जात नव्हतं… मेहनत आणि खेळाचा पूर्ण आनंद घेऊन मी इथपर्यंत पोहोचल्याचं” आदितीने सांगितलं.

अदिती अशोकचं रौप्यपदक थोडक्यात हुकलं, वाचा टोकिया ऑलिम्पिकमधली आदितीची कामगिरी

महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक खेळात तिने चौथे स्थान मिळवलं. शुक्रवारी संपलेल्या तिसऱ्या फेरीनंतर अदिती दुसऱ्या क्रमांकावर होती. अदिती आज चौथ्या फेरीत टॉप -4 मध्ये राहिली. अमेरिकेच्या नेली कोर्डाने सुवर्णपदक पटकावले. आता रौप्य आणि कांस्यपदकांसाठी जपानच्या मोनी इनामी आणि न्यूझीलंडच्या लेडिया को यांच्यात सामना होईल.

पदक जिंकली नाही पण देशाला गोल्फची ओळख करुन दिली!

भारताची महिला गोल्फर अदिती अशोक हिने उत्तम कामगिरी केली. तिने भारतासाठी गोल्फमध्ये पदक जिंकले नाही, परंतु या खेळाला देशात नवी ओळख देण्याचे काम केले आहे. अदिती जगातील 200 व्या क्रमांकाची गोल्फर आहे. पण तिच्या अप्रतिम खेळामुळे तिने सध्याच्या जागतिक क्रमवारीत नंबर वन अमेरिकन नेली कोरडा आणि माजी जागतिक नंबर वन लिडिया को (लिडिया को) यांना कडवी झुंज दिली आहे. 23 वर्षीय अदिती केवळ एका फटक्याने पदक जिंकण्यात चुकली.

रिओ ऑलम्पिकमधून धडा घेतला, टोकियो ऑलिम्पिकमध्ये ‘लढली…भिडली!’

भारतीय गोल्फर अदिती अशोकची ही केवळ दुसरी ऑलिम्पिक होती. तिने 2016 च्या रिओमध्ये ऑलिम्पिक पदार्पण केले. पदार्पणाच्या ऑलिम्पिकमध्ये ती पदकापासून वंचित राहिली होती. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये तिने तिच्या कामगिरीने बरीच प्रसिद्धी मिळवली पण नंतर ती गती कायम राखू शकली नाही आणि तिने 41 व्या क्रमांकावर रिओमधील आपला प्रवास संपवला. पण टोकियोमध्ये तिने रिओच्या चुकांमधून धडा घेतला आणि चौथ्या क्रमांकावर राहून आपला टोकियो ऑलिम्पिकमधला प्रवास संपवला.

एका शॉटने पदक हुकलं…!

भारतीय गोल्फर अदिती अशोकने गोल्फ स्पर्धेत सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. तिने सामन्यावर आपली पकड सातत्याने ठेवली आणि पहिल्या 3 मध्ये स्थान राखले. खेळाच्या तिसऱ्या फेरीच्या समाप्तीनंतर, ती अमेरिकन गोल्फर नेली कोरडा नंतर दुसऱ्या क्रमांकावर होती, म्हणजेच रौप्य पदकाची प्रबळ दावेदार होती. यानंतर, शनिवारी खेळलेल्या चौथ्या आणि शेवटच्या फेरीत ती शेवटपर्यंत पदकाची दावेदार राहिली. पण सामन्यातील शेवटच्या शॉटवर झालेल्या चुकीमुळे पदक जिंकण्याची संधी तिच्या हातातून निसटली.

(Tokyo Olympic India Gold Women Individual Stroke Aditi Ashok)

बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..
बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर...
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय.
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी
VIDEO : बच्चू कडूंच्या आंदोलकांनंतर पुणे पोलिसांची मीडियावर अरेरावी.
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ
पुण्यात दादांचं भाषण सुरू अन् 'प्रहार'च्या कार्यकर्त्यानी घातला गदारोळ.
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?
पुढील 24 तास धोक्याचे... या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, IMDचा अलर्ट काय?.
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.