Tokyo Olympics 2020 Live : भारतासाठी 7 वा दिवस संमिश्र, 3 खेळाडू पदकाजवळ तर मेरिकोमचा पराभव

Tokyo Olympics 2020 Live Updates : टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचा आज सातवा दिवस आहे. आज पीव्ही सिंधू, मेरी कोम आणि अतनु दासशिवाय पुरुष हॉकी टीम आपलं कौशल्य पणाला लावून सामने जिंकण्याचा प्रयत्न करतील.

Tokyo Olympics 2020 Live : भारतासाठी 7 वा दिवस संमिश्र, 3 खेळाडू पदकाजवळ तर मेरिकोमचा पराभव
टोकियो ऑलम्पिक

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 29, 2021 | 11:57 PM

Tokyo Olympics 2020 Live Updates : टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारताचा  सातवा दिवस समिश्र राहिला. आजच्या दिवसाच्या खेळात भारतीय खेळाडूंची कामगिरी संमिश्र राहिली.

मेरिकोमचा पराभव

मेरिकोमचा पहिल्या राऊंडमध्ये पराभव झाला असून इंग्रिट लोरेना वालेंशियानं तिला 4-1 ने पराभूत केलं आहे. मात्र, दुसऱ्या राऊंडमध्ये मेरिकोमनं कमबॅक केलं आहे. मेरिकोमनं इंग्रिटाला 3-2 नं हरवलं. मात्र, इंग्रिटानं तिसऱ्या राऊंडमध्ये पुनरागमन केल्यानं मेरिकोमचा पराभव झाला. मेरिकोमचा 2-3 असा पराभव झाला.

पीव्ही सिंधू क्वार्टर फायनलमध्ये

पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 ने सहज जिंकला आणि अवघ्या 41 मिनिटांत हा सामना जिंकला. सिंधूने आता उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने 21-15, 21-13 असा सामना जिंकून स्वत: ला सिद्ध केले आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच सिंधूला इथेही फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.

बॉक्सिंगमध्ये सतिश कुमार क्वार्टर फायनलमध्ये

सतीश कुमारने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. सतिश कुमार पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

हॉकी- भारताने 3-1 ने सामना जिंकला

शेवटच्या क्षणी मिळालेल्या कॉर्नरवरुन हरमनप्रीत सिंगने भारतासाठी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला 3-1 ने हरवलं पराभूत केलं.

आतापर्यंतच्या खेळावर जर आपण नजर टाकली तर पदकांच्या आकडेवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. दुसर्‍या स्थानावर चीन आहे तर जपान तिसर्‍या क्रमांकावर आहे. भारत 46 व्या क्रमांकावर आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 29 Jul 2021 04:04 PM (IST)

  भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव, कोलंबियाच्या बॉक्सरकडून हार

  मेरिकोमचा पहिल्या राऊंडमध्ये पराभव झाला असून इंग्रिट लोरेना वालेंशियानं तिला 4-1 ने पराभूत केलं आहे. मात्र, दुसऱ्या राऊंडमध्ये मेरिकोमनं कमबॅक केलं आहे. मेरिकोमनं इंग्रिटाला 3-2 नं हरवलं. मात्र, इंग्रिटानं तिसऱ्या राऊंडमध्ये पुनरागमन केल्यानं मेरिकोमचा पराभव झाला. मेरिकोमचा 2-3 असा पराभव झाला.

 • 29 Jul 2021 03:53 PM (IST)

  मेरिकोमचं दुसऱ्या राऊंडमध्ये कमबॅक, मॅच फायनल राऊंडमध्ये

  मेरिकोमचा पहिल्या राऊंडमध्ये पराभव झाला असून इंग्रिट लोरेना वालेंशियानं तिला 4-1 ने पराभूत केलं आहे. मात्र, दुसऱ्या राऊंडमध्ये मेरिकोमनं कमबॅक केलं आहे. मेरिकोमनं इंग्रिटाला 3-2 नं हरवलं

 • 29 Jul 2021 03:50 PM (IST)

  मेरिकोमचा पहिल्या राऊंडमध्ये पराभव

  मेरिकोमचा पहिल्या राऊंडमध्ये पराभव झाला असून इंग्रिट लोरेना वालेंशियानं तिला 4-1 ने पराभूत केलं आहे.

 • 29 Jul 2021 03:44 PM (IST)

  मेरिकोमचा कोलंबियाच्या इंग्रिट लोरेना सोबत सामना सुरु

  ऑलम्पिकमध्ये आज थोड्याच वेळात भारताची बॉक्सिंग खेळाडू मेरिकोम हिची मॅच सुरु  झाली आहे. 51 किलो वजनी गटामध्ये मेरिकोमचा सामना कोलंबियाची इंग्रिट लोरेना वालेंशिया हिच्यासोबत होत आहे. मेरिकोमनं जर हा सामना जिंकला तर ती अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल.

 • 29 Jul 2021 03:31 PM (IST)

  ऑलम्पिकमध्ये थोड्याच वेळात मेरिकोमची मॅच

  ऑलम्पिकमध्ये आज थोड्याच वेळात भारताची बॉक्सिंग खेळाडू मेरिकोम हिची मॅच होणार आहे. 51 किलो वजनी गटामध्ये मेरिकोमचा सामना कोलंबियाची इंग्रिट लोरेना वालेंशिया हिच्यासोबत होणार आहे. मेरिकोमनं जर हा सामना जिंकला तर ती अंतिम 8 मध्ये प्रवेश करेल.

 • 29 Jul 2021 01:02 PM (IST)

  आतापर्यंत कुणाला किती पदकं?

  आतापर्यंतच्या खेळावर जर आपण नजर टाकली तर पदकांच्या आकडेवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. दुसर्‍या स्थानावर चीन आहे तर जपान तिसर्‍या क्रमांकावर आहे.

  1) अमेरिका – 13 गोल्ड, 12 सिल्वर, 10 ब्रॉन्ज, एकूण 35 मेडल

  2) चीन – 13 गोल्ड, 06 सिल्वर, 09 ब्रॉन्ज, एकूण 28 मेडल

  3) जपान – 13 गोल्ड, 04 सिल्वर, 05 ब्रॉन्ज, एकूण 22 मेडल

 • 29 Jul 2021 10:33 AM (IST)

  धनुर्विद्या- क्वार्टर फायनलमध्ये अतनु दासपुढे ऑलिम्पिक मेडलिस्टचं आव्हान

  अतनु दासचा ड्रॉ निश्चित झालेला आहे. प्री-क्वार्टर फायनल सामन्यात अतनु दासचा सामना जपानच्या फुरुकावा ताकाहारूशी होईल. हा सामना शनिवारी रंगणार आहे.

 • 29 Jul 2021 09:44 AM (IST)

  बॉक्सिंग- सतिश कुमार क्वार्टर फायनलमध्ये

  सतीश कुमारने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. सतिश कुमार पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

 • 29 Jul 2021 08:14 AM (IST)

  धनुर्विद्या- अतनु दासने 6-4 ने सामना जिंकला

  अतनुने तिसरा सेट 28-27 ने जिंकला. तथापि, यु डेंगने पुढचा सेट 28-27 असा जिंकून स्कोअर 4-4 अशी बरोबरी केली. अतनू दासने शेवटचा सेट जिंकला आणि सामना 6-4 असा जिंकला.

  शेवटचा सेट

  अतनू दास-10-9-9

 • 29 Jul 2021 07:49 AM (IST)

  हॉकी- भारताने 3-1 ने सामना जिंकला

  शेवटच्या क्षणी मिळालेल्या कॉर्नरवरुन हरमनप्रीत सिंगने भारतासाठी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला 3-1 ने हरवलं पराभूत केलं.

 • 29 Jul 2021 07:24 AM (IST)

  हॉकी : चौथ्या क्वार्टरमध्ये अर्जेंटीनाने 1-1 ने बरोबरी केली

  चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेटिनाने बरोबरी साधून सामन्याची उत्कंठा वाढवली आहे. 48 व्या मिनिटाला अर्जेटिनाच्या केसेलाने पेनल्टी कॉर्नरमध्ये रुपांतर करून 1-1 अशी बरोबरी साधली. हा सामना जिंकणे भारताला गरजेचं आहे.

 • 29 Jul 2021 07:19 AM (IST)

  हॉकी - वरुणकडून सामन्यातला पहिला गोल

  42 व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नरसाठी अपील केलं आणि ते मिळालं. यावेळी वरुणने कॉर्नरचा फायदा घेत सामन्यातील पहिला गोल केला. त्याच वेळी, 45 व्या मिनिटाला संघाला पुन्हा दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु यावेळी ते गोलमध्ये रूपांतरित करू शकले नाहीत. भारताला आतापर्यंत रीबाऊंडवर पाच कॉर्नर मिळाले आहेत.

 • 29 Jul 2021 07:16 AM (IST)

  बॅडमिंटन : 41 मिनिटांत सामना जिंकला, PV सिंधू क्वार्टरफायनलध्ये

  पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 ने सहज जिंकला आणि अवघ्या 41 मिनिटांत हा सामना जिंकला. सिंधूने आता उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने 21-15, 21-13 असा सामना जिंकून स्वत: ला सिद्ध केले आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच सिंधूला इथेही फार कष्ट घ्यावे लागले नाहीत...

 • 29 Jul 2021 07:02 AM (IST)

  बॅडमिंटन : PV सिंधुने पहिला सेट जिंकला

  PV सिंधुने पहिला सेट 21-15 ने जिंकला आहे. सिंधुने यामध्ये ड्रॉप शॉट्स आणि स्मॅथच्या बळावर पाँईट्स मिळवले. 22 मिनिटांच्या पहिल्या सेटमध्ये ती खूपच कंट्रोलमध्ये दिसली.

 • 29 Jul 2021 06:58 AM (IST)

  शूटिंग : तिसऱ्या सिरीजमध्ये राहीकडून चमकदार कामगिरी नाही

  राहीची तिसरी सिरीज म्हणावी अशी गेली नाही. तिला फक्त 94 points मिळवता आले. ज्यामुळे तिचा एकूण स्कोअर आता 287 झालाय. रिलेमध्ये 10 नेमबाजांमध्ये ती सातव्या स्थानावर आहे.

 • 29 Jul 2021 06:53 AM (IST)

  हॉकी- पहिल्या हाफमध्ये दोन्ही टीम 0-0

  आज हॉकीमध्ये भारताचा सामना गतविजेत्या अर्जेंटिनाशी होत आहे. पहिल्या हाफचा खेळ संपला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगला खेळ दाखवला आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत गोल केलेला नाही. भारताजवळ गोल करण्याच्या संधी होत्या पण भारताने त्या संधीचं सोनं केलं नाही.

 • 29 Jul 2021 06:50 AM (IST)

  बॅडमिंटन – PV सिंधुचा सामना सुरु

  पीव्ही सिंधू देखील तिच्या पहिल्या बाद फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डशी सामना करत आहे. पहिल्या गेममध्ये सिंधूने 4-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पराभूत झालेली खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडेल.

Published On - Jul 29,2021 6:42 AM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें