Tokyo Olympics 2021 : भारतीय हॉकी संघाची विजयी सुरुवात, न्यूझीलंड संघावर रोमहर्षक विजय

भारताचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकी खेळामध्ये भारतीय संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे. अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करुन भारताने विजय मिळवला आहे.

Tokyo Olympics 2021 : भारतीय हॉकी संघाची विजयी सुरुवात, न्यूझीलंड संघावर रोमहर्षक विजय
भारतीय हॉकी संघ

Tokyo Olympics 20-2021 : यंदाच्या ऑलिम्पिक खेळांमध्ये (Tokyo Olympics) भारताला पदक मिळण्याची सर्वाधिक आशा असणाऱ्या हॉकी स्पर्धेत भारताने विजयी सुरुवात केली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने (Men’s Hockey Team) सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत 3-2 च्या फरकाने सामना खिशात घातला आहे. कर्णधार मनप्रीत सिंगच्या नेतृत्त्वाखाली हा अप्रतिम विजय भारताने मिळवला आहे. सामन्यात हरमनप्रीत सिंगने 2 आणि रूपिंदर पाल सिंगने एक गोल केला.

सामन्यात पहिला गोल न्यूझीलंड संघाने केला. कीवी टीमने सामन्याच्या पहिल्या 2 मिनिटांतच गोल करत 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर भारताला मिळालेल्या एका पेनल्टी कॉर्नरच्या जोरावर भारताने एक गोल करत सामन्यात बरोबरी साधली. भारताच्या हरमनप्रीत सिंगने हा पहिला गोल केला. मॅचच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीवर होते.

अखेरच्या क्षणात अप्रतिम खेळ दाखवत भारत विजयी

सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताने आपली पकड मजबूत करत न्यूझीलंडच्या गोलपोस्टमध्ये दूसरा गोल दागला. भारताच्या रूपिंदर पाल सिंगने हा गोल केला. त्यानंतर पुन्हा हरमनप्रीत सिंगने तिसरा गोल करत भारताला 3-1 ची आघाडी मिळवून दिली. पण तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस न्यूझीलंडच्या खेळाडूने गोल करत सामना 3-2 च्या स्थितीत आणून ठेवला. ज्यानंतर अखेरच्या काही मिनिटांमध्ये न्यूझीलंडने गोल करण्याचे खूप प्रयत्न केले त्यांना 3 पेनल्टी कॉर्नर देखील मिळाले. पण भारतीय गोलकीपर श्रीजेश उसकीने अप्रतिम गोलकिपींग करत भारताचा विजय निश्चित केला. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया संघासोबत रविवार खेळवला जाईल.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2021 : दीपिका आणि प्रवीणकडून भारताला पदक मिळण्याच्या आशा पल्लवित, तिरंदाजी मिक्स्ड टीमच्या उपांत्यपूर्व फेरीत भारत

Tokyo Olympics 2020 Live : मनिका-शरत जोडी पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर, 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धा सुरु

Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण

(Tokyo Olympics 2021 Indian Hocky team beats New Zealand in First Match)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI