Mirabai Chanu Birthday : ट्रेनिंग सेंटरला जाण्याचेही पैसे नसायचे, सरावासाठी 22 किमी दूरचा प्रवास, अनेक अडचणींवर मात करत पदक पटकावणारी मिराबाई

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले रौप्य पदक मिळवून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूचा आज वाढदिवस. अनेक अडचणींवर मात करत इथवर आलेल्या मीराबाईची कहानी सर्वांसाठीच एक प्रेरणा आहे.

Mirabai Chanu Birthday : ट्रेनिंग सेंटरला जाण्याचेही पैसे नसायचे, सरावासाठी 22 किमी दूरचा प्रवास, अनेक अडचणींवर मात करत पदक पटकावणारी मिराबाई
मीराबाई चानू
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 6:06 PM

मुंबई : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये यंदा अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारताने 7 पदकं पटकावली. यामध्ये 4 कांस्य, 2 रौप्य आणि एका सुवर्णपदकाचा समावेश होतो. पण या सर्वाची सुरुवात केली, ती म्हणजे भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu). ऑलिम्पिकच्या दुसऱ्याच दिवशी वेटलिफ्टर मीराबाईने 49 किलोग्राम महिला वर्गात अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर काय देशभरातून तिच्यावर बक्षिसांचा आणि कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण मीराबाईला मिळालेल्या या यशासाठी तिने केलेली मेहनत उल्लेखनीय आहे. मीराबाईचा आज वाढदिवस असल्याने तिच्या संघर्षाची कहानी थोडक्यात जाणून घेऊया…

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात

मीराबाईचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे  8 ऑगस्ट, 1994 रोजी मणिपूर येथे झाला होता. पाच भावंड असणाऱ्या मीराबाईच्या कुटुंबात जेवणासाठी जळण आणण्याचे काम मुलींकडे असायचे. यावेळी मीराबाई अगदी सहजपणे भरपूर वजनाची लाकडं उचलायची. त्याच ठिकाणी तिला सर्वात आधी तिच्या ताकदीची जाणीव झाली.

कुंजरानी देवींकडून घेतली प्रेरणा

खेड्यात राहणाऱ्या मिराबाईच्या मनात वेटलिफ्टिंग करण्याचा विचार भारताची महान वेटलिफ्टर कुंजरानी देवी यांच्याकडून आला. मीराबाईने आठवीत असताना कुंजरानी यांची गोष्ट वाचली. ज्यानंतर ती तिने वेटलिफ्टर बनण्याचे ठरवले. आज या निर्णयाला सार्थ करत तिने ऑलिम्पिक मेडल मिळवलं आहे.

22 किमी दूर सरावासाठी

मीराबाई सरावासाठी जाण्याकरत ट्रक ड्रायव्हर्सची मदत घेत असेय. ट्रेनिंग सेंटर तिच्या गावापासून 22 किलोमीटर दूर होतं. मीराबाईच गाव नोंगपोक काकचिंग एका बाजूला असल्याने ट्रेनिंग सेंटपर्यंत जाण्यासाठी मीराबाईकडे जास्त सुविधा नव्हत्या. त्यामुळे ती ट्रक ड्राय़व्हर्सची मदत घेत. विजयानंतर तिने त्यांचेही आभार मानले

असं जिकलं ‘गोल्ड’

49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला.

त्यानंतर क्लीन अँड जर्क राउंडची सुरुवात झाली आमि मीराबाईने पहिल्या प्रयत्नातच अप्रतिम कामगिरी करत 110 किलो वजन उचलला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 115 किलो वजन उचललं. पण अखेरच्या तिसऱ्या प्रयत्नात 117 किलो वजन उचलण्यात ती अयशस्वी ठरली. ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर चीनच्या जजिहुने क्लीन अँड जर्कमध्ये 116 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलं.

इतर बातम्या

Tokyo Olympics 2021 : मीराबाई चानूने रचला इतिहास, वेटलिफ्टिंगमध्ये भारताला टोक्‍यो ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोकियोच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(Tokyo Olympics Silver medal Winner Mirabai chanu birthday today)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.