Tokyo Paralympics 2020 मध्ये भारताच्या सिंगराजचं यश, नेमबाजीत पटकावलं कांस्य, भारताचं स्पर्धेतील आठवं पदक

भारतासाठी आजच्या दिवसाची सुरुवात निराशाजनक झाली होती. एका मागोमाग एक पराभव होत असताना निशानेबाजीत मात्र भारताच्या सिंहराजने कांस्य पदक पटकावत दिवसाचं पहिलं पदक मिळवलं आहे.

Tokyo Paralympics 2020 मध्ये भारताच्या सिंगराजचं यश, नेमबाजीत पटकावलं कांस्य, भारताचं स्पर्धेतील आठवं पदक
अधाना सिंगराज
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 1:38 PM

Tokyo Paralympics 2020: भारतीय खेळाडूंसाठी आजचा दिवस (31 ऑगस्ट) टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) काही खास जात नव्हता. एका मागोमाग एक पदकाचे प्रबळ दावेदार असणारे खेळाडू पराभूत होत होते. पण याचवेळी भारताचा नेमबाज सिंगराज अधाना (Singhraj Adhana) यानं कांस्यपदकावर नाव कोरत भारताला दिवसाचं पहिलं तर स्पर्धेतील आठवं पदक मिळवून दिलं.

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी 10 मीटर एअर पिस्तुल एसएच1 गटाच्या अंतिम फेरीत सिंगराजनं हे यश मिळवलं. सिंगराजनं 216.8 गुणांसह हे कांस्यपदक मिळवलं आहे. याच स्पर्धेत पात्रता फेरीत अव्वल येत भारताचा मनीष नरवालही फायलनमध्ये आला होता. पण तो पदकापासून थोडक्यात हुकला आहे. तर स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य ही दोन्ही पदकं चीनच्या नेमबाजांनी मिळवली आहेत.

रुबिना फ्रान्सिस सातव्या स्थानावर

भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिस  महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 च्या फायनलमध्ये  सातव्या स्थानावर राहिली. रूबिनाने असाका शूटिंग रेंजमध्ये फायनलमध्ये 128.1 गुण मिळवले. एसएच1 वर्गात निशानेबाज केवळ एका हाताने पिस्टल पकडतात. त्यांच्या एका हातात किंवा पायात विकार असतो. दरम्यान या स्पर्धेत इरानची सारेह जवानमार्दी 239.2 गुणांसह सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी झाली.

भारताच्या खिशात 8 पदकं

भारताने आतापर्यंत 7 पदकं मिळवली आहेत. ज्यामध्ये दोन सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश आहे. आता सिंगराजच्या या विजयामुळे भारताकडे एक कांस्य पदक आणखी आलं आहे. ज्यामुळे भारताच्या खात्यात एकूण 8 पदकं झाली आहेत.

हे ही वाचा

Tokyo Paralympics मध्ये भारताची सुवर्ण भालाफेक, सुमित अंतिलने जिंकलं सुवर्णपदक, दिवसभरातील पाचवं पदक

Tokyo Paralympics मध्ये भारताला मोठा झटका, विनोद कुमारला कांस्य पदक परत करण्याची वेळ

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यात सूर्यकुमारला जागा नाही, माजी क्रिकेटपटूने सांगितले कारण

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.