Tokyo Olympics Cheer Song : टोक्यो ऑलम्पिक आधी भारतीय टीमला ट्रिब्यूट!, ए आर रहमान आणि अनन्या बिर्लाचा नवा ट्रॅक ‘हिंदुस्तानी वे’ प्रदर्शित

गायिका अनन्या बिर्लानं आपल्या खेळाडूंना ट्रिब्यूट देण्यासाठी एक नवा ट्रॅक तयार केला आहे. 'हिंदुस्तानी वे' असं या ट्रॅकचं नाव आहे.  (Tribute to Indian team before Tokyo Olympics !, AR Rahman and Ananya Birla's new track 'Hindustani Way' screened)

Tokyo Olympics Cheer Song : टोक्यो ऑलम्पिक आधी भारतीय टीमला ट्रिब्यूट!, ए आर रहमान आणि अनन्या बिर्लाचा नवा ट्रॅक 'हिंदुस्तानी वे' प्रदर्शित


मुंबई : टोक्यो ऑलम्पिक 2021 (Tokyo Olympics 2021) मध्ये आपलं सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी टीम इंडियासाठी खेळणारे स्पर्धक सज्ज झाले आहेत. यानिमित्त गायिका-गीतकार अनन्या बिर्लानं (Ananya Birla) आपल्या खेळाडूंना ट्रिब्यूट देण्यासाठी आपला एक नवा ट्रॅक तयार केला आहे. ‘हिंदुस्तानी वे‘ (HINDUSTANI WAY)  असं या ट्रॅकचं नाव आहे.  महत्त्वाचं म्हणजे या उत्साहवर्धक आणि आकर्षक ट्रॅकची रचना आणि निर्माण सेंसेशनल अनन्या बिर्ला आणि ऑस्कर, बाफ्टा आणि ग्रॅमी विजेते संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांनी केली आहे. (Official Team India Cheer Song )

ओलंपियन्समध्ये खेळ भावनेचा संचार करणारा ट्रॅक

अनन्या, निर्मिका सिंह आणि शिशिर सामंत द्वारा संयुक्तपणे लिहिल्या गेलेल्या प्रेरणा-प्रेरक गीतांसोबत देशभक्तिने परिपूर्ण हा ट्रॅक श्रोत्यांना उत्साहित करणारा ठरणार आहे. इंग्लिश व्होकल्स आणि शानदार हिंदी ट्रॅकसोबत टीम इंडियाच्या सर्व ओलंपियन्स यांच्यामध्ये खेळ भावनेचा संचार करवणारा हा ट्रॅक आहे. या सामान्यांमध्ये एकता आणि आशावादाचा संदेश पसरवणारा हा ट्रॅक ठरणार आहे.

पाहा ट्रॅक

या ट्रॅकमध्ये संघाच्या विशेष प्रशिक्षणाचे फुटेज सामील आहे

डैनी मामिक आणि सहान हट्टंगडी यांच्याद्वारे दिग्दर्शित व एंटीमॅटर मीडिया प्रायवेट लिमिटेड द्वारे निर्मित हा म्यूजिक व्हिडीओ, क्रीडाप्रेमींना उलटे आकडे मोजायला उद्युक्त करेल. यामध्ये अटलांटा (1996), एथेंस (2004), बीजिंग (2002, 2008), रियो (2016), लंडन (2012)चे प्रमुख ओलंपिक अभिलेखीय फुटेज आणि या वर्षीच्या संघाचे विशेष प्रशिक्षण फुटेज सामील आहे.

जगभरात कोरोना संक्रमण आणि लॉकडाउनमुळे एका वर्षाच्या स्थगितीनंतर टोक्यो ऑलम्पिक 2020 होणार असून उत्साहाचा पारा नवी ऊंची गाठू पहात आहे आणि जगभरातील या सर्वात मोठ्या खेळ आयोजनातील उत्तम कामगिरीबाबत आपल्या स्टार एथलीट्सकडून भारतीयांच्या आशा देखील पल्लवित होत आहेत. (Official Team India Cheer Song for Tokyo)

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 3 | छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस सूनबाई दिसणार ‘बिग बॉस मराठी’च्या घरात?

तुम्हालाही अभिनय शिकायचाय? अक्षय कुमार देतोय सुवर्णसंधी, ‘खिलाडी’ने सुरु केले प्रोफेशनल मास्टर क्लास!

RRR Movie | भव्य सेट, आगीचे लोट, शेकडोंची गर्दी, ट्रेलरपूर्वी एस.एस.राजामौलींनी दाखवली ‘RRR’ चित्रपटाची झलक!

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI