Tokyo Olympics पदक विजेत्या भारतीयांवर उ.प्रदेश सरकारकडून बक्षिसांचा पाऊस, कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम जाहीर

भारताने यंदा ऑलिम्पिक्स खेळांमध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली. एका सुवर्णपदकासह 7 पदकं खिशात घालणाऱ्या भारतीय खेळाडूंचा भव्य सन्मान उत्तर प्रदेश सरकारने केला आहे.

Tokyo Olympics पदक विजेत्या भारतीयांवर उ.प्रदेश सरकारकडून बक्षिसांचा पाऊस, कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम जाहीर
Tokyo olympic india medal winners

लखनऊ : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) अप्रतिम कामगिरी करुन भारतीय खेळाडू भारतात परतले असून आलेल्या दिवसापासून त्यांचा विविध ठिकाणी सन्मान सुरु आहे. पंतप्रधान, क्रिडा मंत्री, काही राज्यांनी सन्मान केल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने देखील गुरुवारी पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला. युपी सरकारने राजधानी लखनऊमध्ये एक भव्य समारंभ आयोजित करुन पदक विजेत्यांना सन्मानित केलं.

अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला (Neeraj Chopra) दोन कोटी रुपयांच्या रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली. त्यानपाठोपाठ रौप्यपदक विजेता पैलवान रवि दहिया (Ravi Dahiya) आणि वेटलिफ्टर मीराबाई चानूला (Mirabai Chanu) प्रत्येकी दीड कोटी देण्यात आले. तर कांस्य पदक विजेत्या पीव्ही सिंधूसह बॉक्सर लवलीना बोरगोहेन आणि पैलवान बजरंग पुनियाला प्रत्येकी एक कोटी बक्षिस म्हणून दिले. याशिवायत 41 वर्षानंतर पदकाला गवासणी घालणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला एक कोटी रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली. भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी भारत हळूहळू खेळांची महाशक्ति बनत असल्याचं भाष्य यावेळी केलं.

चौथ्या स्थानावरील खेळाडूंनाही बक्षिस

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम कामगिरी करत चौथे स्थान प्राप्त करणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपये यावेळी बक्षिस म्हणून देण्यात आले. तर पैलवान दीपक पुनिया आणि गोल्फर अदिती अशोक यांचेही कांस्य थोडक्यात हुकले पण त्यांनी चौथ्या स्थानापर्यंत मजल मारल्याने त्यांनाही 50-50 लाख रुपये देण्यात आले. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील 10 खेळाडूंना प्रत्येकी 25 लाख रुपये सरकारने यावेळी दिले.

इतर बातम्या

Video: उडे जब जब झुल्फें तेरी, पोरींचा घोळका झूम मिटींगवरच नीरज चोप्रासमोर नाचायला लागला

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

(Uttar pradesh Yogi govt Gifted 42 crore to tokyo olympics medal winners of india)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI