VIDEO : एका गोलने रचला इतिहास, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील एकमेव गोल, पाहा व्हिडीओ

भारतीय पुरुष हॉकी संघा पाठोपाठ महिला हॉकी संघानेदेखील टोक्यो ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाला 1-0 ने नमवत भारतीय महिलांनी ही कामगिरी केली आहे.

VIDEO : एका गोलने रचला इतिहास, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील एकमेव गोल, पाहा व्हिडीओ
भारतीय महिला हॉकी संघ विजयी
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 11:53 AM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय महिला हॉकी संघाने (India’s Women’s Hockey Team) बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.  या विजयासोबत भारतीय महिलांनी प्रथमच सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवत इतिहास रचला आहे. या इतिहासाचा साक्षीदार ठरलेला सामन्यातील एकमेव गोलही भारतीय ऑलिम्पिक संघाकडून ट्विट करण्यात आला आहे. सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियन महिला हॉकी संघावर 1-0 असा विजय मिळवला. भारताकडून गुरजीत कौरने (Gurjeet Kaur) केलेल्या एकमेव गोलच्या व्हिडीओला तुफान लाईक्स पडत आहेत.

सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघामध्ये चुरशीचा आणि अटीतटीचा खेळ दिसून येत होता. दोन्ही संघ गोल करण्याचे प्रयत्न करत होते पण यश कोणालाच येत नव्हतं. भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या भारदस्त संरक्षण आणि आक्रमक अॅटकचं प्रदर्शन या सामन्यात दाखवलं. ज्यानंतर दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताच्या गुरजीतने सामन्यातील एकमेव गोल केला आणि 1-0 ची आघाडी घेतली. दुसरीकडे गोलकीपर सविताने भिंत बनून ऑस्ट्रेलियाचे हल्ले परतवून लावले. ज्यामुळे सामन्यात भारत 1-0 ने विजयी झाला.

ऑस्ट्रेलियाचं कठीण आव्हान भारतीय महिलांनी परतवलं

उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा सामना भारतीय महिलांसाठी कठीण मानला जात होता. दिग्गज आणि तज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलिया संघ अधिक बलाढ्य मानला जात होता. याआधी तीन वेळेस ऑलिम्पिक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने यंदाही ग्रुप स्टेजमध्ये केवळ एकच गोल खाल्ला होता. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ ग्रुप स्टेजमध्ये 7 गोल खाऊन उपांत्य पूर्व फेरीत पोहोचली होती. पण या सामन्यातील 4 क्वार्टरमध्ये 60 मिनिटांपर्यंत अप्रतिम हॉकीचे दर्शन घडवत भारतीय महिलांनी विजयश्री मिळवला.

भारत विरुद्ध अर्जेंटीना

भारतीय महिलांनी ऐतिहासिक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता सेमीच्या सामन्यात भारतीय महिला अर्जेंटीना संघासोबत भिडतील. अर्जेंटीनाने जर्मनी संघाला 3-0 ने  मात देत सेमीफायनल गाठली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना 4 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल.

संबंधित बातम्या 

Women’s Hockey : गोलकीपर सविताने भिंत बनून हल्ले परतवले, गुरजीतने वाऱ्याच्या वेगाने गोल केला, भारत सेमी फायनलमध्ये

Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश

Tokyo Olympics 2020 Live : भारतीय महिला हॉकी संघाची सेमी फायनलला धडक

(Video of goal which gave win to indian women hocky team against australia to reach semi final at tokyo olympics)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.