Tokyo Olympics मध्ये सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्राला बायको कशी हवी?, स्वत:च दिलं उत्तर, म्हणाला…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 29, 2021 | 8:54 PM

भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीमुळे चर्चेत आला होता. पण आता तो डान्स प्लस 6 या रिएलिटी शोमध्ये आला असताना त्याने केलेली धमाल सर्वत्र व्हायरल होत आहे.

Tokyo Olympics मध्ये सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्राला बायको कशी हवी?, स्वत:च दिलं उत्तर, म्हणाला...
नीरज चोप्रा

मुंबई:  7 ऑगस्ट, 2021 रोजी भारतात अगदी खेड्यापाड्यांपासून ते शहरापर्यंत सर्वत्र एकच नाव ऐकू येत होतं. सोशल मीडियावर एकाच व्यक्तीच्या फोटोंचा पाऊस पडत होता. ती व्यक्ती म्हणजे नीरज चोप्रा (Neeraj Chopra). टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजने इतिहास रचला होता. आता या गोष्टीला घडून महिन्याहून अधिकचा काळ लोटला. पण अजूनही नीरजची हवा कमी झालेली नाही. नीरजचे चाहते देशभरात असून तरुणींच्या गळ्यातील तर नीरज ताईत बनला आहे. अशावेळी अविवाहीत नीरजला नेमकी कशी मुलगी बायको म्हणून आवडेल? हा प्रश्न बऱ्याच तरुणींना पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर नीरजने स्वत:च दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी CRED कंपनीच्या एका जाहिरातीत अप्रतिम अभिनय करुन सर्वांची मनं जिंकलेला नीरज कोन बनेगा करोडपती (KBC13) शोमध्येही झळकला होता. त्यानंतर आता नीरज डान्स रिअॅलिटी शो डान्स+6 (Dance+ 6) मध्ये दिसणार आहे. नीरज चोप्रा नुकताच डान्स प्लस 6च्या मंचावर आला होता. या शोमध्ये धमाल करत त्याने काही हटके प्रश्नांची उत्तर दिली.

अशी हवी बायको

डान्स+6 शोच्या दरम्यान, शो होस्ट करणारा राघव जुयाल याने नीरजला त्याच्या चाहत्यांकडून इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तर विचारली. यामध्ये त्याच्या गर्लफ्रेंडच नाव काय? असाही प्रश्न होता. तसंच नीरजबरोबर कुंडली कशी मॅच होईल? असाही प्रश्न विचारला गेला. त्याला नीरजने लाजत कुंडलीतील जास्त काही कळत नाही असं उत्तर दिलं. पण त्यानंतर जजेसमधील पुनीत याने नेमकी कशी मुलगी लग्न करण्यासाठीस आवडेल असा थेट प्रश्न नीरजला विचारला. ज्यावर नीरजने,’माझ्यासारखी खेळाडू असावी. समजून घेणारी, घरातल्यांचा मान राखणारी अशी असावी’ असं उत्तर नीरजने दिलं.

असं मिळवलं नीरजनं सुवर्णपदक

भालाफेकीत नीरज चोप्राने सुरुवातच धडाकेबाज केली. नीराजने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. दुसऱ्या वेळी त्याने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं. तिसऱ्या थ्रोमध्ये 76.79 मीटर थ्रो फेकला तरी अद्यारपही त्याची आघाडी कायम होती. त्यानंतर त्याचा चौथा आणि पाचवा थ्रो फाऊल ठरला. पण त्याने सहाव्या प्रयत्नाआधीत सुवर्णपदक खिशात घातलं होतं. त्यामुळे नीरजचा 84 मीटर लांबीचा सहावा थ्रो केवळ औपचारिकता ठरली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं.

इतर बातम्या

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

Video: जेव्हा टोक्योच्या मैदानावर तिरंगा फडकला, राष्ट्रगीतानं मैदान दुमदुमलं, पहा गोल्डन बॉय नीरजचा भावूक क्षण

(What kind of wife neeraj chopra want he himselfs gave answer in Dance+6 show)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI