5 संधी हुकल्या, कोहली म्हणाला बहाणा चालणार नाही

मोहाली: अॅश्टन टर्नरच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या वन डे सामन्यात भारतावर चार विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियासमोर तब्बल 359 धावांचं बलाढ्य लक्ष्य ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं. टर्नरने केवळ 43 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 83 धावा केल्या.  या विजयामुळे …

5 संधी हुकल्या, कोहली म्हणाला बहाणा चालणार नाही

मोहाली: अॅश्टन टर्नरच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या वन डे सामन्यात भारतावर चार विकेट्स राखून थरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ऑस्ट्रेलियासमोर तब्बल 359 धावांचं बलाढ्य लक्ष्य ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं. टर्नरने केवळ 43 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 83 धावा केल्या.  या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे.

या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच निराश झाला. स्टम्पिंगच्या महत्त्वाच्या संधी दवडणं तसंच खराब क्षेत्ररक्षण महागात पडल्याचं कोहली म्हणाला. अंतिम षटकांमध्ये जवळपास 5 संधी भारताने गमावल्याचं कोहलीने नमूद केलं. या सामन्यात खेळपट्टी चांगली होती, मात्र मागच्या दोन्ही सामन्यांत दवबिंदूमुळे अडचण झाली. असं असलं तरी कोणताही बहाना चालणार नाही, असंही कोहलीने मान्य केलं.

सामना संपल्यानंतर कोहलीने भारताच्या खराब कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना, ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळीच कौतुक केलं. कोहली म्हणाला, “अॅस्टन टर्नर आणि पीटर हॅण्डस्कॉम्बने उत्तम खेळ केला. उस्मान ख्वाजाने डाव सावरुन ठेवला. मात्र भारताचं क्षेत्ररक्षण ढिसाळ झालं. स्टम्पिंगच्या संधी महत्त्वाच्या असतात. डीआरएसचा निर्णय हैराण करणारा होता. हा आता प्रत्येक मॅचमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने उत्तम कामगिरी केली”

ऑस्ट्रेलियाचा विजय

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 50 षटकात 9 बाद 358 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 47.5 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पीटर हॅण्डस्कोम्ब, उस्मान ख्वाजा आणि अश्टन टर्नर हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हॅण्डस्कोम्बने 117, ख्वाजाने 91 धावा आणि टर्नरने 83 धावा केल्या.

संबंधित बातम्या

VIDEO: पंतने स्टम्पिंग चुकवलं, प्रेक्षक ओरडू लागले धोनी धोनी 

5 संधी हुकल्या, कोहली म्हणाला बहाणा चालणार नाही  

INDvsAUS : टर्नरने मॅच फिरवली, ऑस्ट्रेलियाचा भारतावर थरारक विजय 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *