IPL 2025 Autcion : पंतसाठी LSG ने मोजले 27 कोटी, इतका पैसा खर्च करुन मग या टीम्स फायदा कसा कमावतात?

IPL 2025 Mega Autcion : आयपीएलमध्ये फ्रेंचायजी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. सध्या आयपीएल 2025 साठी मेगा ऑक्शन सुरु आहे. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंसाठी फ्रेंचायजींनी 27 कोटी, 26 कोटी इतकी रक्कम मोजली आहे. आता एका प्लेयरसाठी इतका खर्च केला जात असेल, तर मग या टीम्स फायदा कसा कमावतात? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. त्याचीच उत्तर जाणून घ्या.

IPL 2025 Autcion : पंतसाठी LSG ने मोजले 27 कोटी, इतका पैसा खर्च करुन मग या टीम्स फायदा कसा कमावतात?
IPL 2025
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 11:29 AM

इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL. फुटबॉलमधल्या इंग्लिश प्रीमियर लीगच्या धर्तीवर भारतात 2008 साली ही क्रिकेट टुर्नामेंट सुरु झाली. या टुर्नामेंटने फक्त भारतीयच नाही, तर जागतिक क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकला. आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची तिजोरी भरलीच. पण जगातल्या अनेक क्रिकेटपटुंना श्रीमंत बनवलं. आज IPL च्या धर्तीवर जगातील अन्य देशातही क्रिकेट लीग सुरु झाल्या. पण पैसा, लोकप्रियतेच्या बाबतीत या लीग आज आयपीएलच्या जवळपासही नाहीत. याचं कारण आहे भारतात क्रिकेटची लोकप्रियता आणि क्रिकेटपटुंना मिळणारा स्टारचा दर्जा. आज आयपीएलच खरं यश कशात आहे? तर प्रतिभावान क्रिकेटपटुंना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात. आयपीएल सुरु होण्याआधी क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांवर, त्यातही खासकरुन रणजीवर सर्वात जास्त अवलंबून होते. कारण रणजीमध्ये परफॉर्मन्स दिला, तर राष्ट्रीय क्रिकेट संघाचे दरवाजे उघडे व्हायचे. आजही टीम इंडियात निवडीसाठी रणजीमधलं प्रदर्शन, देशांतर्गत क्रिकेटमधली कामगिरी लक्षात घेतली जाते. पण आयपीएलमुळे आज संधी मिळण्याच प्रमाण जास्त आहे. आयपीएलमुळे अनेक छोट्या शहरातील, गावातील खेळाडूंना ओळख मिळाली. अनेक नवीन प्लेयर नजरेत आले. आयपीएलमुळे या प्लेयर्सना देशांतर्गत क्रिकेट टुर्नामेंट्समध्ये संधी मिळण्याच प्रमाण वाढलंय. आज भारतीय क्रिकेटला यामुळे फायदा झाला आहे. उदहारणार्थ रिंकू सिंह, इशान किशन.

आता पुढच्यावर्षी आयपीएलचा 18 वा सीजन असणार आहे. त्यासाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे मेगा ऑक्शन सुरु आहे. IPL 2025 साठी मेगा ऑक्शनच्या पहिल्यादिवशी 84 खेळाडूंची नाव पुकारण्यात आली आहे. त्यात 72 खेळाडूंवर बोली लागली. मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी 467.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आयपीएलमध्ये एकूण 10 टीम्स आहेत. काल लिलावाच्या पहिल्या दिवशी फ्रेंचायजींनी जी रक्कम खर्च केली, तो आकडा पाहूनच डोळे विस्फारतील. टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या मेगा ऑक्शनमधला सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जायंट्स टीमने 27 कोटी रुपये मोजून त्याला विकत घेतलं. त्यानंतर पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरसाठी 26.75 कोटी रुपये खर्च केले. ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. एका प्लेयरला विकत घेण्यासाठी फ्रेंचायजी, जेव्हा इतका पैसा खर्च करतात, तेव्हा या टीम्सचे मालक पैसा कसा कमावतात? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आयपीएल टीम्सच हे गणित समजून घेऊया.

IPL च बिझनेस मॉडेल काय आहे?

क्रिकेट, मनोरंजन आणि मार्केटिक स्ट्रॅटर्जी असं आयपीएलच एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. ही लीग फ्रेंचायजी सिस्टिमवर आधारित आहे. दहा टीम्स भारतातील दहा वेगवेगळ्या शहरांच प्रतिनिधीत्व करतात. या टीम्सचे मालकी हक्क खासगी मालकांकडे असून रेवेन्यू-शेअरिंग मॉडेलवर उत्पन्न आधारित आहे. वेगवेगळ्या स्त्रोतांमधून लीग उत्पन्न कमावते. यात प्रक्षेपण हक्क, स्पॉन्सरशिप डील म्हणजे प्रोयोजकत्व, व्यापारी मालाची विक्री, खेळाडूंचा लिलाव आणि जाहीराती यावर इनकम अवलंबून आहे.

स्पॉन्सरशिप डील

स्पॉन्सरशिप म्हणजे प्रोयोजकत्व हा आयपीएल फ्रेंचायजींसाठी उत्पन्नाच महत्त्वाचा स्त्रोत आहे. वेगवेगळ्या ब्राण्डच्या जाहीरातींसाठी फ्रेंचायजींकडून करार केला जातो. यात कपडे बनवणाऱ्या कंपन्या, पेय उत्पादक कंपन्या, मोबाइल फोन कंपन्या यातून फ्रेंचायजींना एक मोठी रक्कम मिळते. यातून त्यांचे अन्य खर्च भरुन निघतात.

रेवेन्यू शेअरिंग म्हणजे काय?

लीगच जे यश आहे, त्यातून सर्व फ्रेंचायजींना फायदा मिळाला पाहिजे, यासाठी आयपीएलमध्ये रेवेन्यू-शेअरिंग मॉडेलच अनुकरण केलं जातं. सामन्याच जे टेलिकास्ट होतं, तो लीगच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड, BCCI कडून आयपीएल सामन्यांच्या टीव्हीवरील तसेच ऑनलाइन प्रक्षेपणाचे हक्क क्रीडा वाहिन्यांना विकले जातात. टीव्ही सोबतच डिजिटल राईट्स विक्रीतून सुद्धा तितकीत मोठी कमाई होते. यातून जो पैसा मिळतो, तो BCCI आणि सर्व दहा फ्रेंचायजींमध्ये विभागला जातो.

मर्चंडाईज सेल

मर्चंडाईज सेल हा सुद्धा उत्पन्नाचा एक भाग आहे. फ्रेंचायजींकडून त्या टीमची जर्सी, टोप्या आणि अन्य वस्तुंची विक्री केली जाते. त्यातूनही उत्पन्न मिळतं. टीमचे फॅन्स या वस्तू विकत घेतात. टीमची जर्सी, टोप्यांना जी मागणी असते, त्यातून टीमची लोकप्रियता दिसून येते. सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या लोकप्रिय टीम्स आहेत. टीमचे मालक जर्सी, टोप्या विकून या लोकप्रियतेला आर्थिक फायद्यामध्ये बदलतात.

खेळाडूंच्या विक्रीतून पैसा

खेळाडूंचा लिलाव हा आयपीएलमधला महत्त्वाचा भाग आहे. त्यातूनही फ्रेंचायजी पैसा बनवतात. प्रत्येकवर्षी लीग सुरु होण्याआधी खेळाडूंचा लिलाव होतो. या लिलावात टीम्स खेळाडू विकत घेतात. जो खेळाडू संघात हवा, त्यासाठी बोली लावली जाते. खेळाडूच प्रदर्शन आणि लोकप्रियता यावर खेळाडूची किंमत ठरते. संघ मालक एखादा प्लेयर दुसऱ्या टीमला विकूनही पैसा कमावू शकतो. उदहारणार्थ मागच्या सीजनमध्ये गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याच झालेलं ट्रेडिंग. गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला ज्या किंमतीला विकत घेतलं होतं, त्यापेक्षा जास्त किंमतीला त्यांनी हार्दिकला मुंबई इंडियन्सला विकलं अशी चर्चा होती.

जाहीरातीतून कमिशन

आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेटमधील लोकप्रिय खेळाडू खेळतात. जाहीरातींसाठी ब्राण्डकडून या खेळाडूंना मागणी असते. फ्रेंचायजी या खेळाडूंच्या जाहीरातींच व्यवस्थापन करुन त्यातून पैसा कमावू शकतात. खेळाडू जितका लोकप्रिय त्याची जाहीरातीची फी तितकी जास्त. त्यातूनही फ्रेंचायजी पैसा कमावतात.

नाव विकून कमवा पैसा

आयपीएल फ्रेंचायजी त्यांच्या टीमच्या नावाचे हक्क स्पॉन्सरला विकू शकतात. अनेक आयपीएल टीम्ससाठी पैसा कमावण्याचा हा सुद्धा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.

उदहारणार्थ, दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्यांचं नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स केलं. एका उद्योग समूहासोबत करार केल्यानंतर त्यांनी हे नाव बदललं. किंग्स इलेव्हन पंजाबने त्यांचं नाव बदलून पंजाब किंग्स केलं. अन्य एका कंपनीसोबत करार केल्यानंतर नावात हा बदल केला.

स्टेडियमवरच्या तिकीट विक्रीतून किती कमाई होते?

आयपीएल सामन्यांच्यावेळी प्रेक्षक स्टँड नेहमी फुल्ल दिसतात. स्टेडियममधल्या तिकीट विक्रीतून प्रत्येक मॅचमागे काही कोटी रुपयांची कमाई होते. सामना फ्रेंचायजीच्या होम ग्राऊंडवर असेल, तर त्यांना तिकीट विक्रीच्या कमाईतला 80 टक्के हिस्सा मिळतो. त्याशिवाय लोकल टीम जितकी लोकप्रिय, लोकल लेव्हलवर स्पॉन्सर तितके जास्त. त्याशिवाय चॅम्पियनशिप जिंकल्यास प्राईज मनीमधून काही कोटी रुपये मिळतात. त्यातून अर्धा हिस्सा टीमच्या प्लेयर्समध्ये वाटला जातो, अर्धा कंपनी आपल्याकडे ठेवते.

टायटल स्पॉन्सरशिपमधून पैसाच पैसा

DLF आयपीएल, वीवो आयपीएल, टाटा आयपीएल…ही सर्व टायटल स्पॉन्सरशिपची उदहारणं आहेत. म्हणजे पैसे देऊन आयपीएलसोबत नाव जोडून घेण्याची स्कीम. जी कंपनी सर्वात जास्त बोली लावते, त्यांना टायटल स्पॉन्सरशिप मिळते. क्रिकेटमधून ब्राण्ड प्रमोशन करण्यासाठी टायटल स्पॉन्सरशिप मिळवण्याकडे मोठ्या कंपन्यांचा कल असतो. बीसीसीआयला यातून भरपूर पैसा मिळतो. सध्या टाटा आयपीएलचा टायटल स्पॉन्सर आहे. टाटा ग्रुपने 2022 आणि 2023 या दोन सीजनसाठी 670 कोटी रुपयात हक्क विकत घेतले आहेत. आता 2024 ते 2028 साठी टाटा ग्रुपने 2500 कोटी रुपये मोजून टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क विकत घेतले आहेत. व्हिवोने मध्येच करार मोडला, त्यासाठी त्यांना पेनल्टी म्हणून रक्कम भरावी लागली. टायटल स्पॉन्सरशिपमधून मिळणारा निम्मा पैसा बीसीसीआय स्वत:कडे ठेवते. अर्धा पैसा फ्रेंचायजींमध्ये वाटला जातो.

सध्या आयपीएलच लक्ष्य काय आहे?

नावाचे हक्क विकून फ्रेंचायजी भरपूर पैसा कमावू शकतात. पगार आणि खेळाडूंच्या अन्य सुविधांवर खर्च करण्यासाठी हा पैसा वापरता येतो. आयपीएल आज याच वेगळ्या बिझनेस मॉडलमुळे प्रचंड यशस्वी आहे. लीगच लक्ष मार्केटिंग आणि नवा प्रेक्षक जोडण्यावर आहे. त्यामुळे जाहीरातीतून मिळणारं उत्पन्न वाढतं. थोडक्यात आयपीएलने क्रिकेटमध्ये मोठी क्रांती घडवली आहे. खेळ आणि बिझनेस एकत्र येऊ शकतात. यातून खेळाचा विकास होतो, शिवाय रोजगार निर्मिती होते. बिझनेस वाढतो.

भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएलला सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. या आयपीएलमुळे खेळाद्वारे मनोरंजन होतच. पण यात सहभागी असणारे सर्व घटक मालामाल होतात. मैदानावर खेळणारे खेळाडू, बीसीसीआय आणि फ्रेंचायजी मालक यांना सर्वाधिक पैसा मिळतो. शिवाय रोजगार निर्मिती होते, ती वेगळी.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.