Wimbledon 2022: Live मॅचमध्ये महिला खेळाडूने बॉल बॉयला खाऊ घातला गोड पदार्थ, नेमकं कोर्टवर काय घडलं?

Wimbledon 2022: आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच लक्ष वेधून घेणारी महिला ब्रिटिश टेनिसपटू (British Tennis player) जोडी बराज (jodie burrage) यावेळी आपल्या दिलदारपणामुळे चर्चेत आहे.

Wimbledon 2022: Live मॅचमध्ये महिला खेळाडूने बॉल बॉयला खाऊ घातला गोड पदार्थ, नेमकं कोर्टवर काय घडलं?
jodie burrage
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 28, 2022 | 5:39 PM

मुंबई: आपल्या सौंदर्यामुळे नेहमीच लक्ष वेधून घेणारी महिला ब्रिटिश टेनिसपटू (British Tennis player) जोडी बराज (jodie burrage) यावेळी आपल्या दिलदारपणामुळे चर्चेत आहे. सध्या विम्बलडन स्पर्धा (Wimbledon 2022) सुरु आहे. पहिल्या फेरीत लेसिया विरुद्धच्या सामन्यावेळी अचानक कोर्टवर उपस्थित असलेल्या बॉल बॉयची तब्येत बिघडली. बॉल बॉयची तब्येत बिघडल्याच लक्षात येताच, बराज सामना सोडून त्याच्या दिशेने मदतीसाठी धावली. बराजने त्याला पाणी पाजलं. प्रेक्षकांकडून गोडाचा पदार्थ मागून घेतला व बॉल बॉयला खाण्यासाठी दिला. यामुळे काही वेळासाठी सामना थांबवावा लागला.

बराजने आपल्या कृतीने सर्वांच मन जिंकलं

जोडी बराज काही मिनिटं बॉल बॉयच्या शेजारी थांबली. वैद्यकीय मदत मिळाल्यानंतरच ती कोर्टवर परतली व पुन्हा सामना सुरु झाला. बराजने आपल्या या कृतीने सर्वांच मन जिंकून घेतलं. तिला लेसिया विरुद्धचा हा सामना जिंकता आला नाही. सरळ सेटमध्ये 6-2, 6-3 असा तिचा पराभव झाला.

प्रियकरामुळे टेनिस कोर्टवर परतली

23 वर्षाच्या बराजने बऱ्याच काळानंतर टेनिस कोर्टावर पुनरागमन केलय. वयाच्या 17 व्या वर्षी दुखापतीमुळे तिने खेळणं सोडून दिलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये तिने व्यावसायिक टेनिस खेळायला सुरुवात केली. अलीकडेच ती पाउला बाडोसावर विजय मिळवून प्रसिद्धीच्या झोतात आली होती. जोडी बराज टेनिस कोर्टवर परतली, त्यामागे तिचा प्रियकर आणि रग्बी खेळाडू बेन व्हाइट आहे. त्याच्या प्रोत्साहनामुळे ती टेनिस कोर्टवर परतली. बराजकडे मोकळा वेळ असतो, तेव्हा ती प्रियकर बेन व्हाइटचा एकही सामना चुकवत नाही. ती स्वत: तो रग्बी सामना पाहण्यासाठी हजर असते. दोघेही परस्परांना खूप सपोर्ट करतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें