माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली (Arun Jaitley) यांचं शनिवारी 24 ऑगस्टला निधन झाले. जेटली यांच्या पार्थिवावर दुपारी 2.30 वाजता निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांनी 19 महिने तुरुंगवास भोगला. 1973 मध्ये राज नारायण आणि जेपी नारायण यांनी भ्रष्टाचाराविरोधात उघडलेल्या मोहिमेत जेटली एक प्रमुख युवा नेते होते.