
मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ, अशी भीती वाटते : दानवे
एक कार्यकर्ता तयार करायला दहा वर्ष लागायची. त्यानंतर तो तीस वर्ष पक्षाचं काम करायचा, मात्र आता परिस्थिती बदलली असून पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल की नाही हे सांगू शकत नाही, असं रावसाहेब दानवे पुण्यातील विजय संकल्प मेळाव्यात म्हणाले.