Osmanabad - TV9 Marathi
omprakash rajenimbalkar

शेतकरी आत्महत्येप्रकरणी शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकरांवर गुन्हा दाखल

शिवसेनेचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्यासह अन्य 5 जणांवर फसवणुकीचा आणि शेतकऱ्याला आत्महत्येस (Farmer Suicide) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More »

उस्मानाबादमध्ये काँग्रेसला खिंडार, जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडेंसह डझनभर नेते शिवसेनेत

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी देखील काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि डझनभर जिल्हा परिषद सदस्यांसह राजीनामे दिले आहेत. हे सर्व हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचे दिसत आहे.

Read More »

पद्मसिंह पाटील विरुद्ध निंबाळकर वाद पेटला, पोस्टरबाजीतून भाजपप्रवेशाला ओमराजेंचा कडवा विरोध

‘जब तक ये खेल खतम नहीं होता अपुन इधरीच है’, ‘ज्याची लंका सोन्याची होती, तो धुळीला मिळाला कारण वाईट प्रवृत्तीचा शेवट वाईटच असतो’, ‘व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती सोबतचा संघर्ष चालूच राहील, काल आज आणि उद्यासुद्धा’, ‘वाघाचं कातडं पांघरुन गाढव कधी वाघ होत नसतात’ असे पोस्टर लावून निंबाळकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Read More »

शरद पवार कायमच दैवत राहतील, राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीत सिंह भाजपमध्ये

उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि डॉ. पद्मसिंह पाटील या पितापुत्रांनी भाजपप्रवेशाची घोषणा केली.

Read More »

राष्ट्रवादीला मराठवाड्यात हादरा, आमदार राणा जगजीतसिंह वडील पद्मसिंह पाटलांसह भाजपच्या वाटेवर

खुला संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जगजीतसिंह पाटील यांनी 31 ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. ‘दादा… नवी दिशा, नवी आशा… मला तुमच्याशी काही बोलायचंय!! परिवार संवाद, आवर्जून उपस्थित राहा’ असे फलक लावण्यात आले आहेत.

Read More »

डॉ. पद्मसिंह पाटलांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडून बगल

डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा येणार नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read More »