परदेशातील चकाचक रस्त्यांवर गाड्यांचा चेसिंग सिक्वेन्स, हिरोईन्सची ‘धाकड’ गर्ल स्टाईल हाणामारी, ग्लॅमरसोबतच हॉटनेसचा तडका यासारख्या अनेक गोष्टी मराठी सिनेमात बघतांना खरंच बरं वाटतं. सिनेमात बरेच बाळबोध प्रसंगही आहेत, पण जर त्याकडे कानाडोळा केला तर नक्कीच हा सिनेमा तुम्हाला निराश करणार नाही.