2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नव्हती. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही आघाडी तुटली होती. त्यामुळे सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते.
लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून पुण्यातील आठ विधानसभापैंकी सहा जागांची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.