
मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, संपत्ती तब्बल…
रिलायन्स समुहाचे चेयरमन मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3,80,700 कोटी रुपये इतकी आहे (Mukesh Ambani the Richest Indian). आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीनुसार (IIFL Wealth Harun India list) लंडन येथील एसपी हिंदुजा आणि त्यांचं कुटुंब 1,86,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.