
भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकच्या 5 ते 7 घुसखोरांचा खात्मा
भारतीय लष्कराने काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या पाच ते सात बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पाकिस्तानी बॉर्डर अॅक्शन टीमकडून (BAT) भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न लष्काराने हाणून पाडला आहे.