कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 13 बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार हे स्वत: मुंबईत येणार आहेत.
कर्नाटक काँग्रेसच्या 11 आमदारांनी त्यांचा राजीनामा परत घ्यावा, यासाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या सोफिटेल हॉटेलसमोर आंदोलन केलं. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजीही केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक पोलिसांनी या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
काँग्रेससह भाजपचे अनेक नेते काँग्रेस-जेडीएस आमदारांची मनधारणी करण्यासाठी सोफिटेल हॉटेलमध्ये पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारचे भवितव्य मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.