राणे परिवाराला रोखण्यासाठी शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांना मंत्रिपद देण्याची रणनीती आखली जात आहे. तर रायगड आणि रत्नागिरीत वर्चस्व राखण्यासाठी तटकरे कुटुंब फील्डिंग लावत असल्याची चर्चा आहे.
कोकणातल्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्गचं एक वेगळ स्थान राहीलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदासंघ आहेत. यामध्ये कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघांचा समावेश आहे.