ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन सादर केलं.
जायकवाडी धरणातून (Jayakwadi dam) गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. पावसाळा सुरु होऊन अडीच महिने लोटले, मात्र मराठवाड्यात अत्यल्प पाऊस झाला आहे.
नांदूर मधमेश्वर धरणातून 24 हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला अक्षरशः पूर आला आहे. पुराचं हे पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका इथे दाखल झालं आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी एक टक्क्याने वाढली आहे.