वर्ल्डकप पराभवानंतर कोहलीचे पंख छाटण्याची तयारी, रोहित शर्मा नवा कर्णधार?

विश्वचषक 2019 मध्ये सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागलेल्या टीम इंडियामध्ये आता मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची विभागणी होण्याची चिन्हं आहेत.

World Cup Final : बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनची माफी मागितली

इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे 84 धावांची खेळी करणार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स. सामनावीर ठरलेल्या स्टोक्सने जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडचा विजय खेचून आणला.

धोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे'

विश्वचषक 2019 चा अंतिम सामना आतापर्यंतच्या सर्वाधिक रोमांचक अंतिम सामन्यांपैकी एक ठरला. ह्रदयाचे ठोके बंद करणाऱ्या या सामन्यात नशीबने इंग्लंडची साथ दिल्याने न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंड विश्वविजेता ठरला.

ICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर

सामना टाय झाल्यामुळे विश्वचषकाची फायनल सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. मग न्यूझीलंडनेही 15 धावाच केल्याने, आयसीसीच्या नियमानुसार संपूर्ण मॅचमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा…

World Cup 2019 संपला, मात्र सचिन तेंडुलकरचा विक्रम कुणालाही मोडता आला नाही

भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला. मात्र, रोहित शर्मासह जगातील कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडता आला नाही.

ENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा?

जेव्हा सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला, तेव्हा सर्वाधिक चौकार मारणारा विजयी या निकषावर निर्णय घेण्यात आला. आयसीसीच्या याच नियमामुळे टाय राहूनही इंग्लंडला विश्वविजेता होण्याचा मान मिळाला.

ENG vs NZ: बोल्टच्या ‘या’ पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं

आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ट्रेंट बोल्टच्या एका पावलानं न्यूझीलंडचं विश्वचषकावर नाव कोरण्याचं आणि जगज्जेतं होण्याचं स्वप्न भंगलं. सामन्यातील 49व्या षटकातील चौथा चेंडू न्यूझीलंडसाठी घातक ठरला.

ENGvsNZ: विश्वविजेता टाय! सुपर ओव्हरचा थरार!! इंग्लंड जगज्जेता!!!

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अंतिम सामन्याचा थरार सुपर ओव्हरपर्यंत चालला. यात इंग्लंडने बाजी मारत इतिहास रचला. इंग्लंडला पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरण्यात यश आले आहे.