‘एअरटेल’कडून आणखी एक भन्नाट प्लॅन लाँच

मुंबई : जिओने टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर प्रतिस्पर्धी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. तर प्रत्येक कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध  प्लॅन लाँच करते. त्याचप्रकारे एअरटेलनेही एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. हा नवीन प्लॅन एअरटेलच्या प्रीपेड युजर्ससाठी असेल. काही महिन्यांपूर्वी व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी 279 रुपयांचा एक प्लॅन लाँच केला होता. एअरटेलने याच पार्श्वभूमीवर हा नवीन …

Airtel, ‘एअरटेल’कडून आणखी एक भन्नाट प्लॅन लाँच

मुंबई : जिओने टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर प्रतिस्पर्धी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. तर प्रत्येक कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध  प्लॅन लाँच करते. त्याचप्रकारे एअरटेलनेही एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. हा नवीन प्लॅन एअरटेलच्या प्रीपेड युजर्ससाठी असेल. काही महिन्यांपूर्वी व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी 279 रुपयांचा एक प्लॅन लाँच केला होता. एअरटेलने याच पार्श्वभूमीवर हा नवीन प्लॅन लाँच केला आहे. मात्र, या प्लॅनची व्हॅलिडिटी ही केवळ 48 दिवसांची असेल.

एअरटेलचा हा नवीन प्लॅन सतत फोनवर बोलणाऱ्यांसाठी आहे. कारण या प्लॅन अंतर्गत 48 दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. पण या प्लॅनमध्ये फक्त 1GB डेटा मिळणार आहे. त्यामुळे हा प्लॅन केवळ सतत कॉलिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. तर 48 दिवसांपर्यंत प्रत्येक दिवशी 100 SMS करता येतील.

दुसरीकडे व्होडाफोनच्या प्लॅनमध्ये 279 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग तर प्रतिदिन 100 SMS करता येणार आहेत. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये 4GB डेटा मिळणार असून, या प्लॅनची व्हॅलिडिटी ही 84 दिवसांची आहे.  असं असलं तरी एअरटेलच्या प्लॅनचं वैशिष्टय म्हणजे हा ओपन मार्केट प्लॅन आहे. यामध्ये व्हॉईस कॉलिंगसाठी कोणतीही मर्यादा नाही.

याआधी एअरटेलने 299 रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन देखील अनलिमिटेड कॉलिंगसाठी आहे. मात्र, यामध्ये इंटरनेट आणि SMS सेवा उपलब्ध नाही. या प्लॅनची व्हॅलिडिटी 45 दिवसांची आहे. त्यामुळे एअरटेलच्या 299 प्लॅनपेक्षा 289 रुपयांचा प्लॅन अधिक फायदेशीर ठरतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *