अमेझॉनवर महासेल, दहा हजार रुपयापर्यंतची सूट

मुंबई : अमेझॉनवर समर सेल 2019 ची सुरुवात झाली आहे. हा सेल 4 मे ते 7 मे 2019 असा तीन दिवस सुरु राहणार आहे. यामध्ये स्मार्टफोन, स्पीकर्स, टीव्ही, ऑडिओ प्रोडक्ट्स, मोबाईल एक्सेसरीज, फिटनेस ट्रॅकरसारख्या प्रोडक्टवर सूट मिळणार आहे. तसेच यामध्ये शाओमीच्या प्रोडक्टवर 10 हजार रुपयापर्यंतची सूट मिळणार आहे.  Xiaomi Mi LED TV4 Pro 55 शाओमीच्या …

अमेझॉनवर महासेल, दहा हजार रुपयापर्यंतची सूट

मुंबई : अमेझॉनवर समर सेल 2019 ची सुरुवात झाली आहे. हा सेल 4 मे ते 7 मे 2019 असा तीन दिवस सुरु राहणार आहे. यामध्ये स्मार्टफोन, स्पीकर्स, टीव्ही, ऑडिओ प्रोडक्ट्स, मोबाईल एक्सेसरीज, फिटनेस ट्रॅकरसारख्या प्रोडक्टवर सूट मिळणार आहे. तसेच यामध्ये शाओमीच्या प्रोडक्टवर 10 हजार रुपयापर्यंतची सूट मिळणार आहे.

 Xiaomi Mi LED TV4 Pro 55

शाओमीच्या या टीव्हीवर 10 हजार रुपयांची सूट मिळत आहे. हा टीव्ही 44 हजार 999 रुपयांत तुम्ही खरेदी करु शकता. अमेझॉनवर या टीव्हीची किंमत 54 हजार 999 रुपये दिली आहे आणि सूट मिळणार असल्याने 44 हजार 999 रुपयांत टीव्ही विकला जात आहे.

 Xiaomi Redmi 6 Pro

शाओमीच्या या स्मार्टफोनवर एक हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या स्मार्ट फोनची किंमत 9 हजार 999 रुपये आहे आणि डिस्काऊंट ऑफरमध्ये फोन 8 हजार 999 रुपयांमध्ये मिळत आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे.

Xiaomi Redmi Y2

रेडमी व्हाय 2 चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा फोन 9 हजार 999 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरासह 5.99 इंचाचा डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 3080mAh बॅटरी क्षमता दिली आहे.

Xiaomi Redmi Note 5 Pro

रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोनमध्ये 4 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. 5 प्रो फोन सेलमध्ये 10 हजार 999 रुपयामध्ये विकला जात आहे. या फोनमध्ये 6 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज दिला आहे. या फोनची मुळ किंमत 11 हजार 999 रुपये आहे. या फोनवर एक हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

Xiaomi Redmi 6

अमेझॉनच्या या सेलमध्ये रेडमी 6 वर एक हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या सूटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजचा व्हेरिअंट 6 हजार 999 रुपयामध्ये मिळत आहे.

Xiaomi Mi A2

रेडमीच्या सर्वच फोनवर कंपनीकडून आकर्षित अशा सूट देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये ए2 स्मार्टफोनवरही एक हजार रुपयांची सूट मिळत आहे. 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटवाला फोन 10 हजार 999 रुपयात खरेदी करु शकता, तर 6 जीबी रॅमसोबत 128 जीबी स्टोरेजचा फोन 15 हजार 999 रुपयांत खरेदी करु शकता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *